शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदमांकडे लाखोंचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 23:29 IST

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेनामी मालमत्ता असल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेनामी मालमत्ता असल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच तक्रार अर्जावरून एसीबीने सुरु केलेल्या चौकशीदरम्यान यापैकी एक असलेल्या नगरसेवक परमेश्वर कदमकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. कदम यांनी एकूण कायदेशीर उत्पन्नच्या 64.17% म्हणजेच 13 लाख 09 हजार 419 एवढी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालिका निवडणुकीत मनसेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या मनसे नगरसेवक परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा संशय वर्तविण्यात आला. सखोल चौकशी व्हावी यासाठी मनसेच्या वतीने नगरसेवक संजय तुर्डे यांनी गेल्या वर्षी एसीबीकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने चौकशीला सुरुवात केली आहे. यापूर्वी भाजपा खासदारनेही याबाबत तक्रार दिली होती.या चौकशीदरम्यान नगरसेवक परमेश्वर कदमकडे बेनामी संपत्ती आढळून आली. घाटकोपरच्या रमाबाई नागरातील वॉर्ड क्रमांक 128 मधून कदम हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मनसेतून त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भ्रष्टाचार करून गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारी एसीबीकडे आल्या होत्या. या तक्रारीवरून एसीबी केलेल्या तपासात कदम यांनी 16 फेब्रुवारी 2007 ते 15 फेब्रुवारी 2012 या काळात नगरसेवक असताना एकूण कायदेशीर उत्पन्नच्या 64.17% म्हणजेच 13 लाख 09 हजार 419 एवढी संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावरील कारवाईमुळे अन्य नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना