शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pratap Sarnaik: परिवहनमंत्री प्रताप सरनाईक एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:53 IST

महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार प्रताप सरनाईक यांच्यावर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले. एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. ताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६वे अध्यक्ष असणार आहेत.  

महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार प्रताप सरनाईक यांच्यावर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सरनाईक यांच्या आधी मुख्य सचिव संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतेच परिवहन खाते देण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी अधिकृतपणे प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा केली.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे आभार मानले.

एसटी महामंडळाचा इतिहासदरम्यान, १९६० साली एसटी महामंडळाची स्थापना झाली. र.गो.सरैय्या हे एसटी महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले. २०१४ ते २०१९ मध्ये दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार संभाळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. प्रताप सरनाईक यांच्या आधी फडणवीस यांनी संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtraमहाराष्ट्र