शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:24 IST

सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे.

मुंबई - सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात पोहोचले आहेत. बैठकीसाठी दुपारी 2 वाजताची वेळ दिल्यानंतर रावते पाच वाजता मुख्यालयात पोहोचले.

लवकरच एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनांसोबत बैठक सुरु होणार आहे. एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे राज्यभरात प्रवाशांचे हाल होत आहेत.  ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणा-या आठ विभागातील एसटी डेपोमध्ये शुकशुकाट दिसत येत असताना, दुपारपर्यंत या विभागातून अवघ्या १३ गाड्या सुटल्या. त्यामुळे एसटीचे दिवसभराचे जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

ठाणे विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत ठाणे शहरातील दोन विभाग, भिवंडी, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी अशा आठ विभाग येतात. त्या आठ विभागातून दिवसभरात ठाणे जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात (लांब पल्ल्याच्या) सुमारे २,८०० गाड्यांच्या फे-या नियोजित आहेत. परंतु, मंगळवारी दुपारपर्यंत होणा-या १,३८३ फे-यांपैकी अवघ्या १३ गाड्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक ११ गाड्या या शहापूर येथून सुटल्या असून ठाणे, खोपट आणि विठ्ठलवाडी डेपोतून प्रत्येकी एक गाडी सुटली होती.३८ हजार कामगार सहभागी

विभागीय नियंत्रण कार्यालयात असलेल्या ८ विभागात सुमारे ३८ हजार ९८ अधिकारी-कर्मचारी हजेरी पटलावर आहेत. जवळपास ३८ हजार कामगार संपात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यूवाहक असलेले वाकचौरे यांची एस.टी. महामंडळात २२ वर्षे सेवा झाली आहे. सकाळपासूनच ते आंदोलनात बसून होते. दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नोकरी जाईल, याचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. बसस्थानकावजळील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या संपाविषयी सरकार उदासीन असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. दरम्यान एस.टी. संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून कर्मचारीही बसस्थानकात आंदोलन करीत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संप