शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध, कर्मचारी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 18:29 IST

एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला.

बुलडाणा : एसटी कर्मचा-यांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांसह शासनाचा निषेध केला. विविध मागण्यांकरिता एसटी कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे.प्रवाशांचे अतोनात हाल होत असले तरी शासनाने मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे.  त्यामुळे जोपर्यंत ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढसह विविध मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आपल्या मागण्यांची कोणत्याही प्रकारे शासन दखल घेत नसल्यामुळे शुक्रवारी बुलडाणा बस आगारातील कर्मचा-यांनी शासनाचा निषेध करण्याकरिता मुंडन केले. यावेळी बुलडाणा बस आगारातील अनेक कर्मचा-यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. बस स्थानक परिसरात कर्मचा-यांनी मुंडन केले. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.झुनका भाकर खाऊन केली दिवाळी साजरीबुलडाणा आगारात 19 आॅक्टोबर रोजी आंदोलनकर्त्या कामगारांने झुनका भाकर खाऊन ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी केली. आंदोलन स्थळी कुठल्याही प्रकारची दिवाळी साजरी न करता झुनका भाकर खाऊन या शासनाचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ऐकीचे प्रदर्शन करीत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

टॅग्स :ST Strikeएसटी संप