शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत स्पेशल: किन्नर ‘ईच्छा’च्या स्वप्नपूर्तीचा सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 22:11 IST

‘ईसका नाम ईच्छा है... ईसका आज बर्थ डे है’ - नागपुरात भरचौकात साजरा झाला आनंदोत्सव

तिरस्काराऐवजी मिळाली आपुलकी - अनेकांच्या साथीने ‘ते’ गदगदले

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: वेळ -मंगळवारी, सायंकाळी ४. ३० ते ५ वाजताची. स्थळ - रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी मार्गावरचा सिग्नल. येथे जमलेले किन्नर आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देतानाच ‘स्वप्नपूर्ती’ करणाऱ्या महिला-मुलांना लाख दुवा देत होते. विशेष म्हणजे, यावेळी त्या वाजवात तशा त्यांच्या नेहमीच्या टाळ्या नव्हत्या. आताच्या टाळ्यांना लयबद्ध शूभेच्छांची साथ होती. हॅप्पी बर्थ डे टू यू... चे गीत होते. सामाजिक भान राखणाऱ्या महिला-मुलांनी भर रस्त्यावर साजरा केलेल्या एका किन्नराच्या वाढदिवसाच्या या अनोख्या कार्यक्रमात अनेक अनाहुत पाहुणे सहभागी झाले होते. त्यांनी हा अनोखा कार्यक्रम आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओच्या रुपाने कैद करून क्षणात तो असंख्य व्हॉटस्अॅप गृपवर व्हायरल केला होता अन् पहिल्यांदाच तिरस्काराऐवजी त्या बिचाऱ्यांच्या वाट्याला कौतूक आले होते. तिरस्कृत अन् बहिष्कृत जीवन जगणारा घटक म्हणजे किन्नर ! त्याचे नुसते नाव जरी कानावर पडले तरी बहुतांश मंडळींचे नाक तोंड मुरडले जाते. पदोपदी उपेक्षा अन् तिटकारा सहन करत जगणारे किन्नर कधी रेल्वेत, कधी बाजारात तर कधी गर्दीच्या ठिकाणी फिरून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जगण्यामरण्याची लढाई लढताना दिसतात. कोरोनाने गर्दी कमी केली. बाजाराला टाळे लावले अन् रेल्वेतही जागा नाकारली. त्यामुळे अलिकडे ही मंडळी सिग्नल सिग्नलवर टाळया वाजवत आपली सांज भागविताना दिसते. अनेकजण त्यांना काही देण्याचे सोडा, ते नुसते जवळ जरी आले तरी अंग चोरून घेताना दिसतात. मात्र, तिरस्काराचा अनुभव घेणाऱ्या या समुहाची आजची सायंकाळ कमालीची मस्तानी ठरली. कोणताही गाजावाजा न करता रस्त्यावरच्या निराधार जिवांना मोफत जेवण वाटत फिरणाऱ्या सुषमा नागरे कांबळे, अनूश्री खोब्रागडे, विक्की गायधने, सूरज सोलंकी रोजच्या प्रमाणे मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास रहाटे कॉलनी चौकाजवळ पोहोचले. तेथे त्यांनी जेवणाची थाळी एका किन्नराच्या हातात ठेवली अन् तिच्या (की, त्याच्या ?)सह अवती भवती असणाऱ्यांनी टाळ्या वाजवत या भोजनदान करणाऱ्या मंडळींना आशीर्वाद दिले. ‘ईसका नाम ईच्छा है... ईसका आज बर्थ डे है’, असेही सांगितले. त्यांनी हे सहज सांगितले. मात्र, भोजनदान देणारांनी ते खूपच आस्थेने घेतले. लगेच बाजुच्या चौकातून बर्थ डे केक बोलवून घेण्यात आला अन् सिग्नालच्या बाजूला, फुटपाथवर किन्नर ईच्छाचा बर्थ डे साजरा करण्यात आला. फक्त ५ ते १०मिनिटांचाच हा कार्यक्रम. परंतू सिग्नलवर थांबलेल्या अनेकांना तो भावला. त्यांनी आपापली वाहने बाजुला थांबवून टाळ्या वाजवत ईच्छासह तिच्यासोबतच्या किन्नरांना शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडीओही बनविला. हा व्हिडीओ क्षणात अनेकांच्या मोबाईलवर पोहचला. 

आनंदाश्रू घळघळले

व्यक्ती छोटा असो अथवा मोठा, स्त्री असो की पुरूष, अतिआनंद झाला की त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू आपसूकच ओघळतात. मान सन्मान, आपलेपणा मिळेल, अशी  अपेक्षाच न बाळगणाऱ्या किन्नरांसाठी हा प्रसंग स्वप्नासारखाच होता. त्याचमुळे केवळ किन्नर ईच्छाच नव्हे तर तिच्या समुदायालाच आनंदाश्रू रोखणे कठीण झाले होते. 

...दस लाख की दुआए लौटाती है !

बालकाच्या नामकरण सोहळ्यापासून तो विविध आनंदसोहळ्यात किन्नरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवले जाते. त्यांचे तेवढे काम आटोपले की नंतर मात्र त्यांना आमंत्रीत करणारापासून तो कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांपैकी बहुतांश मंडळी तृच्छ नजरेने बघतात. हा समूह मात्र ‘सदा खूष रहो’चा आशीर्वाद देत निघून जातो. कुणी एक शायर यांच्या बाबतीत म्हणतो... सिर्फ दस रुपये दिल से देके देखो, उसे दस लाख की दुआए लौटाती है!  किन्नर है साहाब जात उसकी, दुसरोंकी खुशियों के लिये ही वो ईबादत करके आती है!! 

टॅग्स :nagpurनागपूरTransgenderट्रान्सजेंडर