शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीप्झ’चा कायापालट करणे काळाची गरज, येत्या काळात ३० अब्ज डॉलर निर्यात अपेक्षित - पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:29 IST

१९७३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील पायाभूत सुविधा आणि जुन्या इमारतींची अवस्था पाहून दुःख होत आहे. सीप्झच्या कायापालटाबाबत व्यावहारिक आणि कल्पक तोडग्यासह सूचना करण्याचे आवाहन त्यांनी समभागधारकांना केले. व्यवहार्य प्रस्तावांना सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल.

मुंबई : मुंबईतील सांताक्रुझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन अर्थात सीप्झ प्रकल्पाचा संपूर्ण कायापालट करणे काळाची गरज असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. गुरुवारी त्यांनी सीप्झशी संलग्न उद्योग व व्यापार प्रतिनिधींशी संवाद साधला. १९७३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील पायाभूत सुविधा आणि जुन्या इमारतींची अवस्था पाहून दुःख होत आहे. सीप्झच्या कायापालटाबाबत व्यावहारिक आणि कल्पक तोडग्यासह सूचना करण्याचे आवाहन त्यांनी समभागधारकांना केले. व्यवहार्य प्रस्तावांना सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल. आपापल्या ताब्यातील मालमत्तांची डागडुजी करून त्यांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या उद्योगांना त्या मालमत्तांवरील भाडे आकारणीत १० वर्षांकरिता सूट देता येईल. या व अशा प्रकारच्या सार्वजनिक, खाजगी भागीदारी योजनांचा यासंदर्भात विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले.नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या कायापालटासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्या धर्तीवर ‘जागतिक चटई क्षेत्रा’ची संकल्पना मुंबईत राबवू शकतो का, याविषयी अभ्यास करणे गरजेचे आहे. भारत व्यापार प्रोत्साहन संस्था (आयटीपीओ) सीप्झमध्ये ३० हजार चौरस फुटांचे प्रदर्शन केंद्र उभारू शकते आणि गरज पडल्यास त्याचा खर्च आणि व्यवस्थापन सीप्झद्वारे करता येईल. या माध्यमातून सीप्झला उद्योगाचे गतिशील ऊर्जा केंद्र बनविता येईल, असे गोयल म्हणाले. सीप्झ-सेझ मधून ३० अब्ज डॉलर्सची निर्यात अपेक्षित  आहे. ५० ते ६० हजार लोकांना रोजगार देण्यापेक्षा ५ लाख नोकरदारांना सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीत गुंतवणूक करण्याचे नियोजन करा. उद्योग क्षेत्राला महत्त्वाकांक्षी होण्याचा सल्ला या वेळी गोयल यांनी दिला. देशाचे निर्यात उद्दिष्ट गाठण्यासंबंधित चर्चेवर भर देण्यात आला.

जागेचा पुरेपूर वापर व्हावा!सीप्झ-सेझमध्ये नवे उद्योग स्थापण्यास किंवा अस्तित्वात असलेल्या उद्योगांचा विस्तार करण्यास जागेची कमतरता भासत असल्याचा मुद्दा या वेळी भागधारकांनी उपस्थित केला. त्यावर गोयल म्हणाले, १०५ एकरांहून अधिक विस्तार असलेल्या या परिसरात अनेक ठिकाणी अनावश्यक जागा व्यापली गेली आहे. विशेषतः सरकारी विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या एखाद्या भूभागाचा पुरेसा वापर होत नसल्याचे आढळल्यास त्वरित निदर्शनाला आणून द्या, ती जागा वापरात आणण्यासंदर्भात पावले उचलू, असेही त्यांनी सांगितले.

हीच संधी...: रत्न आणि दागिने क्षेत्रास चालना देण्यासाठी मार्च २०२२ पर्यंत हंगामपूर्व कराराचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या आकारत असलेल्या शुल्कात ५ टक्के सवलत मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करीत असल्याचे गोयल म्हणाले. जगभरातील खरेदीदार मिळविण्यासाठी आणि सीप्झचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपल्याकडे विलक्षण संधी आहे. वाढीव बदल न करता परिवर्तनशीलता निर्माण करण्यासाठी त्रैमासिक पुनरावलोकन कार्यक्रम आखला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलGovernmentसरकार