शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या; पुणे, नागपूर, नाशिक अन् मुंबईची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 21:23 IST

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. याचबरोबर एका पोलीस अधीक्षकांची बदली पोलीस उप महानिरीक्षक पदावर करण्यात आली आहे. 

अशा आहेत बदल्या...

  • सुरेश कुमार मेकला यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 
  • राजकुमार व्हटकर यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. राजेश कुमार यांना संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथेच पदोन्नती देण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 
  • संजय सक्सेना प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 
  • अनुप कुमार सिंह यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे. 
  • निखिल गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथे नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • रविंद्र सिंगल यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 
  • सुखविंदर सिंह यांची अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 
  • तर एस टी राठोड यांची पोलीस उप आयुक्त, बृहनमुंबई येथून अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे. 
टॅग्स :Policeपोलिस