शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

राज्यातील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आयटी संचालकपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:36 IST

रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे.

मुंबई - रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Choudhari) यांची बदली (Transfer) करण्यात आली आहे. मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, आता त्यांच्या जागी महेंद्र कल्याणकर हे रायगडचे जिल्हाधिकारी असतील. निधी चौधरी यांनी १ जानेवारी २०२० रोजी रायगड जिल्हाधिकारी पदाची धुरा स्वीकारली होती. (Transfers of eight officers in the state; Raigad Collector Nidhi Chaudhary as IT Director at Mumbai)

रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या -- डॉ महेंद्र कल्याणकर यांची रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.- रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.- एम. बी. वरभुवन हे मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव होते. त्यांना  बदली करून ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- अजित पवार यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.- संजय दैने यांना हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Transferबदलीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार