शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 07:42 IST

निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

यात एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत असते. यावेळीही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

विशेष म्हणजे, या बदल्या तातडीने करण्याचे आदेश आयोगाने दिले असून, त्यासाठी येत्या मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्य प्रशासनात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील. महसूल, पोलिस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळे या विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या होतील. 

कुणाच्या होणार बदल्या?  एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेले किंवा गृह जिल्हा असलेले पोलिस दलातील आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पालिका आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होतील.

यादी करण्यास सुरुवातनिवडणूक आयोगाने बदलीचे आदेश देताना त्यासाठी कमी कालावधी दिल्याने पोलिस, महसूल तसेच इतर विभागांनी बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील बदली आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग