शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा प्रवास होतोय निम्म्या तिकीट दरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:56 IST

प्रवाशांकडून रेल्वे केवळ ५३ टक्केच तिकीट वसुल करत आहे. उर्वरीत ४७ टक्के अनुदान स्वरूपात सवलत दिली जाते.

ठळक मुद्देरेल्वेकडून केवळ ५३ टक्के रक्कम वसुल : ४७ टक्क्यांचे मिळतेय अनुदानरेल्वे प्रशासनाकडून आता ‘गिव्ह इट अप’ योजना सुरू प्रवाशांमधील विविध ५३ प्रकारच्या प्रवाशांना तिकीट दरात सवलत

पुणे : रेल्वेचा प्रवास अत्यंत स्वस्तात असल्याने प्रवाशांचीच नेहमीच झुंबड उडालेली असते. पण प्रत्यक्षात प्रवाशांकडून रेल्वे केवळ ५३ टक्केच तिकीट वसुल करत आहे. उर्वरीत ४७ टक्के अनुदान स्वरूपात सवलत दिली जाते. म्हणजे, सध्या ५३ रुपये तिकीटाचा दर असेल तर प्रत्यक्षात त्याचा दर १०० रुपये असतो. रेल्वे प्रवाशांकडून ४७ रुपये कमी घेत आहे. याचा उल्लेख तिकीटांवरही केला जातो. पण अनेक प्रवासी याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून आता ‘गिव्ह इट अप’ योजना सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवाशांना तिकीटावरील अनुदान नाकारण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.देशामध्ये रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. सुमारे सव्वा कोटीहून अधिक प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांमधील विविध ५३ प्रकारच्या प्रवाशांना तिकीट दरात सवलत दिली जाते. त्यामध्ये दिव्यांग, रुग्ण, ज्येष्ठ नागिरक, विविध पुरस्कार विजेते, शहीद जवानांच्या पत्नी, खेळाडू, ज्येष्ठ नागरीक आदींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे रेल्वेला प्रवासी उत्पन्नात दरवर्षी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची तुट सहन करावी लागते. सध्या रेल्वेकडून प्रवाशांकडून एकुण उत्पन्नाच्या केवळ ५३ टक्के तिकीट दर घेतला जातो. याचा अर्थ रेल्वेचे ४७ टक्के उत्पन्न अनुदान रुपाने खर्च होतो. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रवाशांचा प्रवास केवळ ५३ टक्के तिकीट दरामध्येच होत आहे. प्रवाशांना ४७ टक्के सवलत दिली जाते. याबाबत प्रवासी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून रेल्वे तिकीटांवरही याबाबतची माहिती छोट्या अक्षरांमध्ये एका ओळीत देण्यात येत आहे. पण त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना याबाबत माहितीच नाही. विविध घटकांतील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे रेल्वेला एकुण उत्पन्नाच्या केवळ ५३ टक्के उत्पन्न मिळते. त्यामुळे रेल्वेचा खर्च भागविणे त्यातून शक्य होत नाही. मात्र, माल वाहतुकीतून रेल्वेला मोठा फायदा होतो. समजा माल वाहतुकीसाठी १०० रुपये खर्च केले तर त्यातून १४० रुपये मिळतात. रेल्वे ४० रुपयांचा फायदा होत असल्याने यातून रेल्वेची आर्थिक घडी बसविली जाते. पण विविध प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी, विविध विकासकामे करण्यासाठी अधिकचा खर्च होतो. या पार्श्वभुमीवर रेल्वेने ‘गिव्ह इट अप’ ही योजना आणण्याचा निर्णय घेतल्याचे, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..............भारतीय रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी शंभर दिवसांची योजना तयार करून मागील महिन्यात पंतप्रधान कार्यालयाकडे दिली आहे. त्यामध्ये गिव्ह इट अप योजनेचाही समावेश आहे. केंद्र सरकारने गॅसचे अनुदान न घेण्यासाठी पहिल्यांदा गिव्ह इट अप ही योजना सुरू केली होती. त्याचप्रकारे रेल्वेकडूनही तिकीटावरील अनुदान न घेण्याबाबत प्रवाशांना आवाहन केले जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना दोन पर्याय दिले जातील. पहिल्या पर्यायामध्ये अनुदानासहित म्हणजे सध्या असलेल्या दरात तिकीट घ्यायचे आणि दुसऱ्या पर्यायामध्ये अनुदान सोडून पुर्ण रकमेचे तिकीट घ्यायचे, असे पर्याय असतील. यासाठी प्रवाशांना सक्ती केली जाणार नाही. रेल्वेने २०१७ मध्येच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे. त्यामध्ये सुमारे ४८ लाख प्रवाशांना अनुदान सोडल्याने रेल्वे ७४ कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. पण या योजनेचा अपेक्षित प्रचार-प्रसार न झाल्याने प्रतिसाद मिळाला नाही. आता रेल्वेकडून ही योजना लवकरच प्राधान्याने राबविली जाणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या काही सवलती१. दिव्यांग-प्रथम व द्वितीय श्रेणी, शयनयानमध्ये ७५ टक्के२. रुग्ण (कॅन्सर, थॅलेसिमिया, हृदयरोग, मुत्रपिंड, हिमोफिलिया, क्षयरोग, कुष्टरोग) - प्रथम व द्वितीय श्रेणी, शयनयानमध्ये ७५ टक्के३. ज्येष्ठ नागरीक (६० वर्षांपुढील पुरूष) - सर्व श्रेणीमध्ये ४० टक्के(५८ वर्षांवरील महिला) - सर्व श्रेणीमध्ये ५० टक्के४. शहीद जवानांच्या पत्नी - द्वितीय व शयनयान श्रेणीमध्ये ७५ टक्के५. विद्यार्थी (शैक्षणिक सहल) - खुला गट - द्वितीय व शयनयान श्रेणीमध्ये ५० टक्के एससी व एसटी गट - ७५ टक्के - पदवीपर्यंत शिक्षणाऱ्या मुली व बारावीपर्यंतची मुले - लोकल, पॅसेंजर गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणीचा मोफत मासिक पास६. तरूण - राज्य व केंद्र सरकारच्या नोकरीसाठी मुलाखतीला जाणारे बेरोजगार - द्वितीय श्रेणीत १०० टक्के तर शयनयान श्रेणीत ५० टक्के

.............

* असे असेल ‘गिव्ह इट अप’पुणे स्टेशन ते लोणावळा लोकल सध्याचे तिकीट - १५ रुपयेअनुदान गिव्ह अप केल्यानंतरचे तिकीट - २८ रुपये

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेticketतिकिटpassengerप्रवासीDivyangदिव्यांग