शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतूक सेवा 24 तासांहून अधिक काळ विस्कळीत, डाऊन लाइन आजही बंद राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 22:31 IST

गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन मार्गावरील वाहतूक आज दिवसभर बंदच होती.

लोणावळा, दि. 8 - गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन मार्गावरील वाहतूक आज दिवसभर बंदच होती. गुरुवारी मालगाडीचे डबे घसरल्याने अनेक लांब पल्ल्या‍च्या गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने गुरुवार व शुक्रवार दोन्ही दिवस प्रवाशांचे हाल झाले.मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे डाऊन लाइनवरून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी ही गुरुवारी दुपारी खंडाळा बोगद्यातून बाहेर निघाल्यानंतर किमी 123 व 124 दरम्यान आली असता अचानक झालेल्या ब्रेक डाऊनमुळे सहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात एक डबा हा मिडल लाइनवर गेला तर मालाने भरलेल्या इतर डब्यांमुळे जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत स्लिपर तुटले गेले, रेल्वे रूळ तुटले काही वाकडे झाले, विजेचे खांब तुटून पडल्याने मुंबई पुणे मार्गावरील डाऊन, अप व मिडल या तिन्ही लाईनवरील वाहतूक गुरुवारी पूर्णतः ठप्प झाली होती.अपघाताची माहिती समजल्यानंतर रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम हाती घेत शुक्रवारी सकाळी रेल्वे मार्गावरील अप व मिडल या दोन लाईन सुरु केल्या. आज शुक्रवारी दुपारी 12.40 वाजता मालगाडीचे रुळावरुन सरकलेले डबे सहा इंजिनच्या सहाय्याने लोणावळा शेडमध्ये ओढून नेण्य‍ात आले. यानंतर रेल्वे कामगारांचे हजारो हात एकाच वेळी खंडाळा रेल्वे गेट ते खंडाळा बोगदा दरम्यान तुटलेले खराब झालेले स्लिपर व  रेल्चे रुळ बदलण्याचे काम करण्यासाठी झटले होते. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कंत्राटदार, मुकादम यांची टीम कामगारांकडून काम करून घेत होती. मात्र मोठ्या प्रमाणात स्लिपर्स तुटल्याने आज रात्री देखील डाऊन लाईन बंदच राहण्याची शक्यता आहे.