शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

वाहतूक पोलिसाचेच अपहरण

By admin | Updated: August 11, 2015 04:01 IST

बेदरकारपणे मोटार चालवीत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर ही मोटार तशीच सुसाट पळवल्यामुळे वाहतूक पोलिसाने पाठलाग करून त्याला अडवले.

वारजे : बेदरकारपणे मोटार चालवीत असलेल्या चालकाला वाहतूक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर ही मोटार तशीच सुसाट पळवल्यामुळे वाहतूक पोलिसाने पाठलाग करून त्याला अडवले. परंतु या वाहतूक पोलिसाचे अपहरण करून त्यालाच पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी बंगळुरू-मुंबई महामार्गावरील वडगाव पूल ते चांदणी चौकादरम्यान घडली. केवळ १०० रुपयांचा दंड वाचवण्यासाठी हा उपद्व्याप करणाऱ्या मुंबईच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोटारचालक प्रशांत विभाकर पिराळे याच्यासह त्याचा साथीदार दीपक सूर्यकांत मेंदगे (दोघेही वय ४८, रा. सोनी अपार्टमेंट, जरीमरी, कुर्ला, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार मयूर कालिदास मंडले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडले व त्यांचे सहकारी विलास चोंडकर दत्तवाडी वाहतूक विभागामध्ये नेमणुकीस आहेत. सोमवारी सकाळी त्यांना सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ वाहतूक नियोजनाचे काम देण्यात आले होते. सकाळी सव्वादहाच्या सुमारास एक लाल रंगाची चारचाकी गाडी (एमएच ०३- बीसी ४९८) बेदरकारपणे व भरधाव जात असल्याचे त्यांनी पाहिले. सिंहगड रस्त्याने येऊन महामार्गावर जाण्यासाठी वळत असताना या वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. परंतु पिराळे याने ही मोटार (कात्रजच्या दिशेला) नवले पुलाकडे वळवली. त्यामुळे मंडले यांना संशय आला. त्यांनी एका तरुणाच्या दुचाकीवरून मोटारीचा पाठलाग सुरू केला. नवले पुलाखाली त्यांनी ही मोटार थांबवली. त्याच्याकडे कागदपत्रांची तसेच वाहन परवान्याची मागणी केली. त्यानंतर या दोघांनीही मोटार पुन्हा वडगाव पुलाच्या (मुंबईच्या) दिशेने जाण्यासाठी वळवली. मंडले यांनी पुन्हा दुसरी दुचाकी थांबवून त्यांचा पाठलाग सुरू केला. थोडा वेळ पाठलाग केल्यानंतर त्यांनी दुचाकी आडवी घालून मोटार अडवली. आरोपी पुन्हा पळून जाऊ नये, म्हणून दरवाजा उघडून वाहनात मागच्या बाजूस बसले. गाडी जवळच असलेल्या वारजे वाहतूक विभागात किंवा पोलीस चौकीत घेण्यास सांगितले. मात्र आरोपींनी गाडी भरधाव वारजेच्या दिशेने नेली. मंडले यांना घाबरवण्यासाठी आरोपींनी काही जणांना मोबाइलवर फोन करून गुंड लोकांना बोलावून घे, असे सांगितले. त्यामुळे मंडले त्यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला मोबईलवरून फोन करून आपले अपहरण झाले असून गाडीचे वर्णन व ती मुंबईच्या दिशेला जात असल्याचे कळविले. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच चांदणी चौकात असलेले वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक शिवराम कदम, सहायक फौजदार सुरेश ओंबासे व कर्मचारी नितीन यांनी कर्मचाऱ्यांना सावध केले. कदम यांना वायरलेसवर या वाहनाचे वर्णन मिळाले. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी महामार्ग सोडून भूगाव रस्त्याला जात असलेल्या गाडीतून मंडले ओरडण्यास व हातवारे करून मदत मागतच होते. पोलीस पथकाने तत्काळ गाडी अडवली व मंडले यांची सुटका करून आरोपींना ताब्यात घेऊन वडगाव पोलीस चौकीत आणले आणि अखेर पाऊण तास चाललेल्या अपहरणनाट्यावर पडदा पाडला. आरोपींवर सरकारी कर्मचाऱ्याच्या अपहरणासह कलम ३६३, ३५३, ३३२, २७९, ५०६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल के ला आहे. नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याने मिळाली मदतभरधाव मोटार चालवत निघालोेल्या चालकाला थांबण्याचा इशारा देऊनही तो मोटार न थांबवता तसाच सुसाट निघून गेला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून या मोटारीला अडविले. सुरुवातीला या दोघांनीही मोटार पुन्हा वडगाव पुलाच्या (मुंबईच्या) दिशेने जाण्यासाठी वळवली. मंडले यांनी पुन्हा दुसरी दुचाकी थांबवून त्यांचा पाठलाग सुरू केला. थोडा वेळ पाठलाग केल्यानंतर त्यांनी दुचाकी आडवी घालून मोटार अडवली. आरोपी पुन्हा पळून जाऊ नये, म्हणून दरवाजा उघडून वाहनात मागच्या बाजूस बसले. गाडी जवळच असलेल्या वारजे वाहतूक विभागात किंवा पोलीस चौकीत घेण्यास सांगितले. मात्र आरोपींनी गाडी भरधाव वारजेच्या दिशेने नेली. मंडले यांना घाबरवण्यासाठी आरोपींनी काही जणांना मोबाइलवर फोन करून गुंड लोकांना बोलावून घे, असे सांगितले. त्यामुळे मंडले यांनी नियंत्रण कक्षाला मोबईलवरून फोन करून अपहरण झाले असून गाडीचे वर्णन व ती मुंबईच्या दिशेला जात असल्याचे कळविल्याने पोलिसांनी तसा सापळा लावून मोेटार अडवून चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.सकाळी अकराच्या सुमारास वायरलेसवर या लाल रंगाच्या मोटारीबाबत कॉल मिळालाच होता. कॉल संपता संपताच गाडी समोर दिसली. आतमधील कर्माचारी मंडले खिडकीतून बाहेर हात काढून हातवारे करीत व जोरजोराने बोलत होते. त्यामुळे कॉल नसता आला तरी काही तरी गडबड आहे, असे समजून आम्हाला ते वाहन थांबवावेच लागले असते.- शिवराम कदम, पोलीस उपनिरीक्षक , वारजे वाहतूक विभाग