लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार अजय शिरसाठ यांना मारहाण करणाऱ्या योगेश शिंदे (२४, रा. भिवंडी) या टेम्पोचालकाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. कळव्यातील शिवाजी चौक येथे९ मे रोजी दुपारी शिरसाठ हे वाहतुकीचे नियमन करीत होते. त्याच वेळी मुंबईकडून येणाऱ्या एका टेम्पोला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. टेम्पोचालक शिंदे याने मात्र त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो तसाच पुढे नेला. याबाबत शिरसाठ यांनी त्याला विचारणा केली असता चालक शिंदे याने खाली उतरून शर्टाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.
वाहतूक शाखेच्या हवालदाराला मारहाण
By admin | Updated: May 11, 2017 03:07 IST