ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ - मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील कसा-याला जाणा-या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसटीहून कसा-याला जात असताना सव्वा आठच्या सुमारास लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. ही घटना कोपर स्थानकावरील फलाट क्र ३ वर घडली. दरम्यान, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या गतीच्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तसेच, या आगीमुळे कोणातही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला आग
By admin | Updated: July 12, 2016 21:13 IST