शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार; ७३०० बाजारपेठांना फटका, तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 05:44 IST

ग्रोमा संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन ५ टक्के जीएसटीमुळे व्यापारावर गंभीर परिणाम होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : केंद्र शासनाने विनाब्रँडेड खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात शनिवारी मुंबई बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहार दिवसभर बंद ठेवले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा  व्यापाऱ्यांनी दिला. 

मुंबई बाजार समितीच्या द ग्रेन राईस अँड ऑइल सीड मर्चंट असोसिएशन (ग्रोमा) व चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या  नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी आंदाेलन केले. बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील सर्व दुकाने बंद ठेवली होती. मसाला मार्केटमध्येही होलसेल विक्रेतेही बंदमध्ये सहभागी झाले होते. दोन्ही मार्केटमधील जवळपास २५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे गहू, तांदूळ, डाळी, पीठ या वस्तूंवर कर लागणार आहे.

अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी शनिवारी कडकडीत बंद पाळला. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, धुळे, औरंगाबादसह बहुतांश ठिकाणी व्यवहार बंद ठेवले. 

महाराष्ट्र चेंबरतर्फे केलेल्या या बंदच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये गांधी सहभागी झाले. लोकप्रतिनिधी खासदार व आमदार यांना चेंबरच्या वतीने निवेदने देण्यात आले. सरकारने दाद न दिल्यास अन्नधान्य व खाद्यपदार्थांव्यतिरिक्त अन्य व्यापारीही आंदोलनात उतरून आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल. पुढील दिशा ठरवण्यासाठी २४ जुलैला औरंगाबाद येथे पदाधिकाऱ्यांची महापरिषद आयोजित केली आहे.

भाजीपाला फळ मार्केट सुरू 

जीएसटीविरोधात आंदोलनामध्ये धान्य व मसाला व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. भाजीपाला, फळ व कांदा मार्केटमधील वस्तूंवर जीएसटी लागणार नसल्यामुळे त्यांना आंदोलनातून वगळले होते. मसाला मार्केटमधील किरकोळ विक्रीची दुकानेही सुरू होती.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 

ग्रोमा संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन ५ टक्के जीएसटीमुळे व्यापारावर गंभीर परिणाम होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. या विषयावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाशी चर्चा करण्याचे आवाहनही केले. यावेळी ग्रोमाचे अध्यक्ष शरद मारू, भीमजी भानूशाली, नीलेश वीरा, जगदीश ठक्कर व इतर व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :GSTजीएसटीMaharashtraमहाराष्ट्र