शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारीही आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:30 IST

जीएसटी, परदेशी गुंतवणूक, प्लॅस्टिकबंदीविरुद्ध मागण्या

पुणे : रिटेल ट्रेड -ई-कॉमर्समध्ये शंभर टक्के परदेशी गुंतवणूक, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी व ब्रॅन्डेड आणि अनब्रॅन्डेड वस्तूंवरील जीएसटी आकारणीस विरोध, प्लॅस्टिकबंदी, व्यावसायिक वीज दरवाढ आदी विविध मागण्यांबाबत केंद्र आणि राज्य शासनाने एक महिन्यात निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी पुण्यात झालेल्या व्यापा-यांच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला.दि़ पूना मर्चंटस चेंबर, चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अ‍ॅन्ड ट्रेड मुंबई व फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्स महाराष्ट्र यांच्या संयक्त विद्यमाने व्यापा-यांचे विविध प्रश्न व शासनाकडे प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यव्यापी व्यापारी परिषदे पुण्यात चेंबरच्या सभागृहात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेतचेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष वालचंद संचेती, चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अ‍ॅन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरनानी, राजू राठी,चेंबरचे उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, नितीन ओस्तवाल, गणेश चोरडिया आदी उपस्थित होते़ या परिषदेस मुंबई, सोलापूर, मोडनिंब, लातूर, अमरावती, नांदेड, करमाळा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अकोला, पिंपरी चिंचवड, नागपूर, रत्नागिरी,शिरुर आदी ठिकाणांहून व्यापारी आले होते़. या परिषदेत विविध ठराव संमत करण्यात आले़ओस्तवाल यांनी सांगितले की, बाजार समितीचा कायदा हा १९६३ मधील असून तो आता कालबाह्य झाला असून तो रद्द करावा़ प्लॅस्टिकसाठी सक्षम पर्याय दिल्याशिवाय बंदी लागू करु नये, वीज दरवाढ विरोध, ई- वे बिलासंबंधी अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्यात असे ठराव परिषदेमध्ये करण्यात आले़ तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बंदसाठी सर्व व्यापारी संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे़

टॅग्स :StrikeसंपMaharashtraमहाराष्ट्र