शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

पोलिस-टॅक्सीचालक वादात माथेरानमध्ये पर्यटक भरडले; गर्दीच्या वेळेत चालकांनी पुकारला संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:31 IST

नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर वीकेंडला होणाऱ्या वाहतूककोंडीतून पर्यटकांची सुटका करण्यासाठी नेरळ पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.

माथेरान : नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर वीकेंडला होणाऱ्या वाहतूककोंडीतून पर्यटकांची सुटका करण्यासाठी नेरळ पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, या कारवाईविरोधात टॅक्सीचालक युनियनने रविवारी अचानक संप सुरू केल्याने माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे अक्षरश: हाल झाले. पोलिस प्रशासन आणि टॅक्सी युनियनमध्ये दुपारी ३ वाजता तोडगा काढण्यात आल्यानंतर पुन्हा नेरळ-माथेरान-नेरळ सेवा सुरू झाली आणि पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणाऱ्या माथेरानमध्ये पावसाळ्यातही पर्यटकांची मोठी गर्दी होते. येथील हिरवी वनराई, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची शनिवारबरोबरच रविवारीदेखील गर्दी झाली. पर्यटकांच्या वाहनांमुळे माथेरान घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना पायपीट करावी लागली. तेव्हा ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रविवारी अचानक नेरळ-माथेरानदरम्यान बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ३० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई झाल्याने टॅक्सी युनियनने वाहतूक सेवा बंद करून २०० वाहनचालकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. घाटात पोलिस उपस्थित राहत नसल्याने पर्यटक तेथे वाहने पार्क करतात, याकडे पोलिस का लक्ष देत नाहीत, असा त्यांनी म्हटले.

चालकांना दिल्या सूचनापोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये, वाहनचालकाने मद्यपान करून वाहन चालवू नये, गर्दीत वाहने एकापाठोपाठ रांगेत लागतील आणि एक महिन्यात ड्रेसकोडची अंमलबजावणी करावी, यांचा समावेश आहे. यावर टॅक्सी युनियननेदेखील अनुकूलता दाखवत आंदोलन मागे घेतले आणि पर्यटकांसाठी सेवा सुरू केली.

वाहनचालकांचा संप; पर्यटकांचे मात्र हालरविवारी सकाळपासून वाहनचालकांचा संप सुरू झाल्याने पर्यटकांचे नाहक हाल झाले. माथेरान उतरण्यासाठी पर्यटकांना चालत नेरळला यावे लागले. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पायी घाट चढावा लागला. हातात सामान आणि लहान मुले खांद्यावर घेऊन पायपीट करावी लागली. दुपारी ३ वाजता पोलिस आणि चालकांचा गोंधळ मिटल्याने वाहनचालक पर्यटकांना घेऊन माथेरानच्या घाटातून पायथ्याशी येऊ लागले. तेव्हा सर्वांना हायसे वाटले.

टॅग्स :MatheranमाथेरानStrikeसंपtourismपर्यटन