शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:40 IST

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.  

मुंबई : राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर  पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. आज मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, मुंबईतील इस्राइलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, इस्राइलचे राजकीय दूत अनय जोगळेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात अनेक शतकांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि चालीरिती स्वीकारल्या आहेत. जगभरातील अनेक इस्रायली आणि ज्यू लोक पर्यटनासाठी मुंबईला भेट देतात आणि त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देण्याची इच्छा असते. या उपक्रमाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी तसेच यासाठी सर्व परवानग्या देण्यासाठी शासन सहकार्य करेल, या सहकार्यामुळे ज्यू वारसा जपला जाईल आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळेलपर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, इरादा पत्रावर झालेल्या स्वाक्षरीमुळे राज्यातील विविध ज्यू वारसा स्थळांचा विकास करणे शक्य होणार आहे. लवकरच इस्राईलचे महावाणिज्यदुत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत जेविश पर्यटन  सुरु करण्यात येईल. मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि  सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.

इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करणारकॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी म्हणाले की, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समुदायांबद्दल आणि महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल जगभरातील ज्यूंमध्ये जागरूकता वाढवण्यास यामुळे मदत होईल. इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, कृपया मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पर्यटन पॅकेज बाबत माहिती देणारएमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी म्हणाल्या की, या इरादा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाच्या मदतीने स्थानिक ज्यू समुदाय आणि  ज्यू स्मारकांमध्ये त्यांच्या इतिहासाची आणि महत्वाची माहिती देणारे फलक लावून एमटीडीसी एक ते तीन दिवसांच्या प्रवासाचे अनेक कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच टूर गाइड आणि हॉटेल्स इत्यादींसह पॅकेज म्हणून ऑफर देखील तयार करण्यात येतील.

 

टॅग्स :MumbaiमुंबईMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाState Governmentराज्य सरकार