शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन, वारसास्थळ ‘पिक्चर’मध्ये!; शासनाच्या जागांवर विनामूल्य चित्रीकरणाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 06:01 IST

देशातील उर्वरित भागांच्या तुलनेत मुंबईमध्ये ५० टक्के अधिक चित्रपट व रोजगार निर्मिती होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सिनेसृष्टीच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवे पाऊल उचलत शासनाच्या नियंत्रणाखालील जागांवर मोफत चित्रीकरणाच्या परवानगीला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने एका अधिसूचनेद्वारे या संदर्भातील माहिती दिली.

राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी जागांवरील चित्रीकरणासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही शासकीय जमिनीवर विनामूल्य चित्रीकरण करता येणार आहे.

चित्रपट निर्मिती केंद्र करण्याचे स्वप्न

     मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासोबतच महाराष्ट्राला जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र बनविण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.     या अंतर्गत मराठीसह देश-विदेशांतील चित्रपट, मालिका, माहितीपट व जाहिरातींना मोफत चित्रीकरण करता येईल.     या योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्मात्यांना अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी एक खिडकी योजनेतून जाहिरातींसाठी ४० हजार रुपये, मालिकेसाठी एक लाख रुपये आणि चित्रपटासाठी अडीच लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात येईल.      यामध्ये काही कालावधीनंतर बदल करण्याचे अधिकार संबंधित विभागांकडे असतील. शासकीय नियंत्रणाखालील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी, कोल्हापूरमधील चित्रनगरी तसेच भविष्यात नव्याने होणाऱ्या चित्रनगरीस ही योजना लागू राहणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.      चित्रीकरणाच्या वेळी सरकारी संस्था तसेच कार्यालयांच्या नियमित कामकाजात अडथळा येणार नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी निर्मिती संस्थेवर राहील. चित्रपट उद्योगाची वाढ, पर्यटनाला चालना देणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि राज्यातील सामाजिक-आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारचे हे पाऊल महत्त्वपूर्ण असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 

५०० निर्मिती संस्था मुंबईत

देशातील उर्वरित भागांच्या तुलनेत मुंबईमध्ये ५० टक्के अधिक चित्रपट व रोजगार निर्मिती होत आहे. मुंबईत साधारणपणे ५०० निर्मितीसंस्था, २५० चित्रपटगृहे आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbaiमुंबई