शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पावसाने सतावले, हिवाळासुद्धा गारठवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 06:27 IST

विशेष म्हणजे, नासा, वर्ल्ड मेट ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांनी उत्तर गोलार्धातील अमेरिका, युरोपमध्ये कडक थंडीचा इशाराही दिला आहे.

- निशांत वानखेडे

नागपूर : ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि थंडीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. हवामानाचा सुरू असलेला ट्रेंड कायम राहणार असून, यावर्षी ज्याप्रमाणे अत्याधिक पावसाने सतावले, त्याप्रमाणे तीव्र थंडीचा प्रभाव जाणविण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गारठविणाऱ्या थंडीच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पॅसिफिक महासागरात वातावरण थंड असणे म्हणजे 'लॉ-निनो' चा प्रभाव मागील तीन वर्षांपासून कायम आहे. यालाच 'ट्रिपल डीप' प्रभाव असेही म्हणतात. १९५० नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अत्याधिक तापमान, पावसाळ्यात अत्याधिक पाऊस आणि हिवाळ्यात अधिक थंडीची जाणीव होते. हा ट्रेंड यावेळीही कायम राहणार असून, कडक थंडी तीव्रतेने जाणवेल. 

विशेष म्हणजे, नासा, वर्ल्ड मेट ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांनी उत्तर गोलार्धातील अमेरिका, युरोपमध्ये कडक थंडीचा इशाराही दिला आहे. या उत्तर गोलार्धातून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव भारतीय उपखंडातही जाणवेल, अशी शक्यता हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरमध्ये गारवा वाढणार असून, डिसेंबर आणि जानेवारी हे महिने तीव्र थंडीचे असतील. डिसेंबरमध्ये दुसऱ्या व चौथ्या आठवड्यात थंडीच्या लाटा येतील, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा अत्याधिक असेल. लॉ निनोच्या प्रभावाने या काळात ढगाळ वातावरणासह एकदोनदा पावसाच्या सरीही येतील.

दरम्यान, पाऊस निघून गेल्यानंतर आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाल्याने थंडी जाणवायला लागली आहे. विदर्भात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान स्थिर असले, तरी रात्रीचे तापमान तीव्रतेने घटत आहे. अमरावती व यवतमाळला पारा सरासरीपेक्षा ४ व ४.४ अंशांनी घटून अनुक्रमे १४.३ व १४ अंशांपर्यंत खाली आला आहे. नागपुरात किमान तापमान १५.६ अंश नोंदविण्यात आले. यासह वर्धा १६ अंश, गडचिरोली १६.२ अंश व इतर जिल्ह्यांत १७ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. नोव्हेंबरमध्ये यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :weatherहवामान