शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By प्रदीप भाकरे | Updated: November 17, 2024 08:32 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले.

प्रदीप भाकरे/मनीष तसरेधामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : मी जे बोलतो, तेच पीएम मोदी बोलतात. वर्षभरापासून मी संविधान रक्षण व आरक्षणाची मर्यादा वाढविण्यावर बोलतो आहे. जात जनगणनेवर मी ठाम आहे. मात्र, पीएम मोदी मला आरक्षणविरोधी व संविधानविरोधी ठरवत आहेत. उद्या ते अशीही दिशाभूल करतील की, मी जात जनगणनेच्या विरोधात आहे. जणू मोदींची मेमरी लॉस झाली आहे, अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे शनिवारी केली.

उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी धामणगाव रेल्वे येथे प्रचारसभा घेतली. राहुल गांधी पुढे म्हणाले, ज्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार चोरले गेले, त्या बैठकीला अदानी होते. सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले गेले. सरकार चोरण्याचा हा असंवैधानिक प्रकार धारावीमुळे घडला. सरकार चोरायचे आहे, धारावीची जमीन हडपवायची आहे, हे संविधानात कुठे लिहिले आहे, असा सवाल करीत, त्या मोबदल्यात धारावीची एक लाख कोटी रुपयांची गरिबांचा जमिनीचा सौदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. धामणगाव रेल्वे येथे खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक पथकाने तपासणी केली तथा त्यांची बॅगदेखील तपासण्यात आली.

...हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र

जीएसटी हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र असून, तो पैसा उद्योगपतींच्या घशात घातला जातो. त्यातून देशातील २५ अब्जाधीशांचे १६ लाख कोटींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले. धारावीची जमीन देत असाल तर तितकीच रक्कम महाराष्ट्रातील जनतेला द्या, अशी मागणी करत ती रक्कम आम्ही देऊ, असे आश्वासन गांधी यांनी दिले.हाती असलेले संविधान दाखवत आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीत ठरावीक अधिकाऱ्यांचा सहभाग, विविध क्षेत्रांतील दलित, आदिवासी, ओबीसींचा नगण्य सहभाग आदींवर भाष्य केले.

दहा लाखांना रोजगार देऊ...

चिमूर : आमचे सरकार पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील १० लाख युवकांना रोजगार देईल. अडीच लाख रिक्त जागा भरू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी चिमूर येथील सभेत दिली. मोदी सरकारने नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. ही गरिबांना मारण्याची, लघु व मध्यम उद्याेगांना संपविण्याची हत्यारे आहेत. 

भाजप सत्तेत आहे तोपर्यंत देशात रोजगार निर्माण होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिभूमी चिमूर येथे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी