शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टोलमाफी झाली; एसटीची दररोज दोन लाखांची बचत; दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:11 IST

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे.

मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी केली आहे. या हलक्या वाहनांमध्ये एसटी गाड्यांचाही समावेश आहे. या टोलमाफीमुळे एसटीची दररोज सुमारे दोन लाखांची बचत होणार आहे. राज्य सरकारने वाशी, दहीसर, मुलुंड, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री या मुंबईच्या प्रवेशद्वारावर आकारण्यात येणाऱ्या टोलमधून हलक्या वाहनांना वगळले आहे.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. त्यामुळे एसटीचे टोलच्या माध्यमातून खर्च होणारे सुमारे २ लाख रुपये दिवसाला वाचणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

तिकीट दर कमी करा राज्यातून मुंबईत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांच्या २००० फेऱ्या होतात. ज्यामध्ये मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांच्या ३०० फेऱ्यांचा समावेश आहे. एसटीला एका फेरीसाठी साधारण १०० रुपये इतका टोल द्यावा लागतो. टोलच्या माध्यमातून एसटीला दिवसाला सुमारे २ लाख तर महिन्याला ६० लाख रुपयांचा भरावा लागणारा टोल वाचणार आहे.  एसटीचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी तिकीट दरही कमी करावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारtollplazaटोलनाका