शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर शेवटपर्यंत कुठेही नसेल ‘टोल प्लाझा’, महामार्गावरून बाहेर पडताना ‘टोल बुथ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:32 IST

Samrudhi Highway : वाहनधारकांना न थांबता अखंडपणे प्रवास करता येणार आहे. मात्र, महामार्गावरून बाहेर पडताना ‘स्लीप रोड’वर टोल बुथ असतील व तेथे ‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘टोल’ आकारला जाईल.

- विजय सरवदे

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यातील या महामार्गाचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल. तथापि, या महामार्गावर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच प्रवेश असेल. दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर या वाहनांसाठी प्रवेश नसणार आहे. विशेष म्हणजे या शीघ्रगती महामार्गावर नागपूर ते मुंबईपर्यंत कुठेही ‘टोल प्लाझा’ राहणार नाही. वाहनधारकांना न थांबता अखंडपणे प्रवास करता येणार आहे. मात्र, महामार्गावरून बाहेर पडताना ‘स्लीप रोड’वर टोल बुथ असतील व तेथे ‘फास्टॅग’च्या माध्यमातून ‘टोल’ आकारला जाईल.‘नागपूर ते मुंबई’मार्गे औरंगाबाद या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा औद्योगिक वसाहत, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. या ठिकाणांवरूनच वाहनधारकांना महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर पडता येणार आहे. अधुन-मधून कुठेही या महामार्गावर प्रवेशही करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही. 

‘एक्झिट बेस टोल’ची अशी आहे संकल्पनायासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल. सध्या आपल्या राज्यामध्ये ‘एन्ट्रीबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोल द्यावा लागतो. त्यासाठी अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोल देण्यासाठी कुठेही थांबावे लागणार नाही. या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनाची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘स्लीप रोड’वर असलेल्या टोल बुथवर एकूण किलोमीटरनुसार आपोआप टोल आकारला जाईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग