शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

खर्च वसुलीनंतरही टोलमध्ये वाढच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 02:16 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर अपेक्षित असलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल बंद करण्याऐवजी येत्या

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर अपेक्षित असलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल बंद करण्याऐवजी येत्या १ एप्रिलपासून त्यामध्ये वाढच होणार आहे़ सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी १९५ रुपये टोल द्यावा लागतो; त्याऐवजी यापुढे २३० रुपये मोजावे लागतील.मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग बांधल्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती व टोल वसूल करण्याचे अधिकार राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबी कंपनीला दिले आहेत. त्यासाठी गुंतविलेली रक्कम, देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च व टोल वसुलीसाठी येणारा खर्च, गुंतविलेल्या रकमेवरील व्याज व या महामार्गावरून य-जा करणारी वाहने यांचा सर्व हिशोब करून २ हजार ८६९ कोटी रुपये वसूल करण्यासाठी कंपनीला ३१ मार्च २०१९पर्यंत टोल वसुलीचे अधिकार दिले आहेत़ प्रत्यक्षात वाहनांची संख्या व त्यात होणारी वाढ कमी गृहीत धरल्याने कंपनीला फेब्रुवारी २०१७पर्यंत ३ हजार ७ कोटी रुपये मिळाले आहेत़ मार्च २०१९पर्यंत हा टोल सुरू राहिला तर कंपनीला किमान ११०० कोटी रुपये अधिक मिळतील़ त्यामुळे हा टोल बंद करावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर १४६१ कोटी रुपये टोल अपेक्षित होता़ परंतु फेब्रुवारी २०१७पर्यंत १३८० कोटी रुपये वसूल झाले आहेत़. येत्या १ एप्रिलपासून या दोन्ही महामार्गांवरील टोलमध्ये वाढ होत आहे़ (प्रतिनिधी)टोल बंद करावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आऱ एल़ मोपलवार यांना नोटीस दिली होती़ त्यामुळे यामध्ये त्यांचाही स्वार्थ असल्याचा संशय असून, तशी तक्रार १५ दिवसांपूर्वी आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली आहे़ पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. - विवेक वेलणकरअध्यक्ष, सजग नागरिक मंच