शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

शौचालय लाभार्थ्यांचा निधी दुकानदारांच्या नावावर जमा

By admin | Updated: July 5, 2017 04:31 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ३५७ लाभार्थ्यांच्या नावाची ३ कोटी १७ लाख ८५ हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ३५७ लाभार्थ्यांच्या नावाची ३ कोटी १७ लाख ८५ हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स रक्कम पंचायत समित्यांनी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न करता खासगी दुकानदारांच्या नावे धनादेश दिले आहेत.लाभार्थ्यांनी दुकानदारांकडून वैयक्तिक शौचालयाचे साहित्य घेऊन जावे, असा शासकीय नियम डावलून मध्यस्थीचा पायंडा पाडल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. परभणी जिल्हा परिषदेने प्रत्येक लाभार्थ्याला वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी ५ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. जि.प.ने ९ पंचायत समित्यांना ६ हजार ३५७ लाभार्थ्यांसाठी ३ कोटी १७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी काही महिन्यांपूर्वी वितरित केला. त्यापैकी फक्त सेलू पंचायत समितीने लाभार्थ्याचे अनुदान थेट त्याच्या बँक खात्यात जमा केले. उर्वरित आठही पंचायत समित्यांनी मात्र थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा न करता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. लाभार्थ्याकडून प्रॉमेसरी नोट लिहून घेण्यात येत आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचे नाव, बँक खाते नंबर, बँकेचा आयएफईसी कोड, एफआयडी नंबर, सदरील दुकानदाराचे नाव व दोन रुपयांच्या स्टँपवर लाभार्थ्याची स्वाक्षरी या डिमांड प्रॉमेसरी नोटवर घेण्यात आली. परभणी पंचायत समितीने ६०० लाभार्थ्यांचे ३० लाख रुपये, जिंतूर पंचायत समितीने ६८७ लाभार्थ्यांचे ३४ लाख ३५ हजार रुपये, गंगाखेड पंचायत समितीने ८०० लाभार्थ्यांचे ४० लाख रुपये, मानवत पंचायत समितीने ११०० लाभार्थ्यांचे ५५ लाख रुपये, पालम पंचायत समितीने २३४ लाभार्थ्यांचे ११ लाख ७० हजार रुपये, पाथरी पंचायत समितीने ४९८ लाभार्थ्यांचे २४ लाख ९० हजार रुपये, पूर्णा पंचायत समितीने १४६८ लाभार्थ्यांचे ७३ लाख ४० हजार रुपये आणि सोनपेठ पंचायत समितीने ९०० लाभार्थ्यांने ४५ लाख रुपये खाजगी दुकानदारांना धनादेश दिले. साहित्याचा दर्जा पाहता ते खरोखरच ५ हजार रुपयांचे आहे की नाही, असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांचे मौनजि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांचा फोन लागला नाही. तर स्वच्छता अभियान कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी नंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले.