मुंबई : राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडल्यानंतर, सोमवारी सायन येथील मानव सेवा संघाच्या सभागृहात मुंबई भाजपा कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, त्यात मुंबईतील सर्व भाजपा आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, मुंबई पदाधिकारी, नगरसेवकपदाचे उमेदवार, मंडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत, तर भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश बैठकीचा समारोप करणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबई भाजपाची आज बैठक
By admin | Updated: April 24, 2017 03:39 IST