शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:41 IST

"या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही."

आज आम्ही पक्ष वैगेरे सर्व बाजूला ठेऊन, महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना या मातीत गाडण्यासाठी एकवटलो आहोत आणि ते गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हीच एक शिवचरणी शपथ घेतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिवसेनेवर (एकनाथ शिंदे गट) निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते.

...तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही -उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सर्वजन ही आमची मातृभूमी मानतो. मुंबई काय महाराष्ट्र काय ही आमची मातृभूमी आहे. पण आमचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फुठात करतात. ती विकली जाणारी जागा नाही. ती आमची माय आहे. आमची माय माऊली आहे. मुंबा आई आहे आणि तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला, तर हे रस्त्यावर जमलेला आगडोंब पेटल्याशिवाय राहणार नाही." 

या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय स्वस्त बसता येणार नाही - "कर्नाटकसह हे सर्वजण एकत्रितपणे महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत. म्हणजे एकाबाजूला महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायची, त्यांचा अपमान करायचा, येऊ शकणारे आणि येणारे, म्हणजे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणारे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात पळवून न्यायचे. गावं कुर्तडायला लागायची. म्हणजे चहूबाजूंनी महाराष्ट्र कसा भिकेला लागेल, हा यांचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

हीच महाराष्ट्राची वज्रमूठ -यावेळी, "आजचा मोर्चा ही सुरुवात आहे. या मोर्चाची ताकद बघायची असेल तर, मी सर्वांना एकच विनंती करतोय. की आपापल्या हातांच्या मुठी उंचावून वळा आणि वर करा. हीच महाराष्ट्राची ताकद आहे. हीच महाराष्ट्राची वज्रमूठ आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईMahavikas Aghadiमहाविकास आघाडी