शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:13 IST

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबाबत धुळे पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत धुळे पोलिसांना कठोर कारवाई न करण्याचे व सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राणे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे. 

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या विधानावरून राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. धुळे पोलीस ठाण्यात २४ ऑगस्टला गुन्हा नोंदविण्यात आला. धुळे येथे गुन्हा दाखल झाल्याने सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात येत असले तरी पत्रकार परिषद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात घेण्यात आली आहे, असे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे. एफआयआरमध्ये केलेले आरोप खोटे आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राणे आणि ठाकरे सरकार यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दोघेही आरोपाची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील राजकारणही यामुळे चांगलेच तापलेले दिसत आहे.

‘ते शब्द चिथावणी  देणारे नाहीत’- राजकीय हेतूने आरोप करण्यात आले आहेत आणि तक्रारदार शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. - राणेंच्या वर्तनामुळे विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढेल किंवा विविध धार्मिंक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटांमधील सलोखा टिकवून ठेवण्यास बाधा आणण्यात आली आहे, असे म्हणता येणार नाही. - पत्रकार परिषदेत जे शब्द उच्चारले आहेत ते चिथावणी देणारे किंवा भडकवणारे नाहीत, असे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय