शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची आजपासून राज्यभर गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:03 IST

३ कोटी ३८ लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट : लस सुरक्षित असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मंगळवार दिनांक २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्षांखालील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.

विधानभवनात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी आरोग्य विभागाचे राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते. उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे....तर रुग्ण दगावण्याची शक्यतागोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार रुग्ण मुत्युमुखी पडतात. गोवर आलेल्या रुग्णामध्ये ताप, अंगावर लालसर पुरळ येणे, सर्दी, खोकला व शिंका येणे अशी लक्षणे दिसून येतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला डोळ्यांचे आजार, तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अतिसार, मेंदूज्वर, न्यूमोनिया असे आजार ही होऊ शकतात व वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्य