शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

औषधविक्रेत्यांचा आज संपाचा इशारा

By admin | Updated: May 30, 2017 04:38 IST

बेकायदा औषध उत्पादन, खरेदी आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेकायदा औषध उत्पादन, खरेदी आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पोर्टलला विरोध करण्याची मागणी करत आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने मंगळवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यव्यापी औषधविक्रेत्यांच्या संघटनांमध्ये फूट पडल्याने काही संघटनांनी या संपाला तीव्र विरोध करत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांमधील कमालीची फाटाफूट पाहता हा संप अयशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.केंद्र शासनाच्या ई-पोर्टलला विरोध, केमिस्टमधील फार्मासिस्टची अनिवार्यता हटवा, या पोर्टलमुळे देशातील ८ लाख औषध विक्रेते आणि ४० लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येईल, अशी भीती व्यक्त करत हा संप पुकारला असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. या संपाला आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटना (एआयओसीडी) व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने (एमएससीडीए), केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट (सीएपीडी) यांनी पाठिंबा दिला आहे. याविरोधात २९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ८ लाख औषधांची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संघटनांमध्येच फूट पडली आहे. या संपात इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन संघटनेने केमिस्टना रुग्णांचे हित लक्षात घेऊन बंद न करण्याचे आवाहन केले आहे. तर या एकदिवसीय संपामागे केंद्राच्या अन्न व औषध प्रसाधन कायद्यात बदल करून फार्मासिस्ट्स हटविण्याचा छुपा अजेंडा आहे, असे म्हणत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे. भारतासारख्या देशाने प्रगत देशांची बरोबरी करताना आपल्याकडे असलेल्या उणिवांची गंभीर दखल घेऊन व त्यावरील उपाययोजनांचा विचार करून अॉनलाइन फार्मसी, ई-पोर्टलसारख्या बाबींचा विचार करणे योग्य होईल. सद्य:स्थितीत अॉनलाइन फार्मसी, ई-पोर्टलची पूर्तता करणे शक्य नाही. केवळ परकीय चलनाची गुंतवणूक आणि स्पर्धात्मक व्यावसायिक व्यवस्था यापेक्षाही सामान्य जनतेचे आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे या एकदिवसीय संपात देशातील ८ लाख औषधविक्रेते आॅनलाइन फार्मसीची नीती व केंद्र सरकारच्या नोटीसविरोधात संपावर जाणार आहेत.- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनाऔषध मिळत नसतील तर १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा.