शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळात आज फेरबदल आणि विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:35 IST

अनेक मंत्र्यांना वगळणार?; नऊ जणांचा शपथविधी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता होणार असून, फेरबदलात काही मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार आहे. नऊ जणांना मंत्री म्हणून शपथ दिली जाणार आहे. सोमवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.सध्या मंत्रिमंडळात २२ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री असून, आणखी पाच रिकाम्या जागा भरणे शक्य आहे. शिवसेनेला दोन व रिपाइंला (आठवले गट) एक मंत्रिपद मिळेल, तर भाजपच्या कोट्यातून सहा नावे आली आहेत. त्यामुळे विद्यमान किमान चार मंत्र्यांना वगळले जाणे निश्चित आहे. वगळण्यात येणाऱ्यांत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे कॅबिनेट मंत्री आहेत. तर अंबरिश आत्राम, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनाही काढले जाऊ शकते. राधाकृष्ण विखे यांना भाजपमधूनच विरोध होता, पण त्यांना मंत्रिपद देण्यासाठी फडणवीस यांनी मध्यस्थी केली. भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार, अनिल बोंडे, संजय कुटे, अतुल सावे, योगेश सागर, सुरेश खाडे, परिणय फुके यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. शिवसेनेमधून अनिल परब वा तानाजी सावंत व राष्ट्रवादी सोडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनाही मंत्रिपद मिळेल.मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी दिल्लीत जातील व मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील, रविवारी विस्तार होईल, हे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री अचानक उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीला गेले. तेथून बाहेर पडताच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे टिष्ट्वट केले होते. ते शनिवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटले व विस्तारावर शिक्कामोर्तब झाले.शपथविधीला उद्धव ठाकरे नाहीतशिवसेना पक्षप्रमुख उद्या होणाºया शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत. ते शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येला जाणार आहेत. शपथविधीच्या वेळीच काँग्रेस, राष्टÑवादीसह विरोधकांची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर होणार आहे. त्यामुळे विरोधकही शपथविधीला हजर राहणार नाहीत. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांनी निर्णय घेतला आहे. नव्या मंत्र्यांसह सोमवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाministerमंत्री