शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवार

By admin | Updated: February 20, 2017 20:36 IST

आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवार

आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवारअमरावती : महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत प्रत्यक्ष मतदान होत आहे. एक जागा अविरोध झाल्याने उर्वरित ८६ जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी महापालिकेसह निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.महापालिका क्षेत्रातीेल ५,७२,६४८ मतदारांसाठी एकूण ७३५ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्राध्यक्षासह तीन मतदान अधिकारी, ईव्हीएम आणि संबंधित साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचते झाले आहे.मंगळवारी महापालिकेच्या ८६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात आला. महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने २२ प्रभागातील ८६ जागांसाठी निवडणूक होत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या यानिवडणुकीसाठी तब्बल ६२८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीची मतमोजणी येथिल विभागीय क्रीडा संकुलातील ईनडोअर स्टेडियममध्ये २३ फेब्रुवारीला होणार आहे. ७३५ मतदान केंद्रासाठी ८१९ पथके, ८०० कंट्रोल युनिट आणि ३२०० बॅलेट युनिट कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मदन तांबेकर यांनी दिली. मतदान केंद्रावरील पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन निवडणूक अधिकारी, एक पोलीस शिपाई आणि आवश्यकतेनुसार एक शिपाई राहणार आहे. महापालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक सोमवारीच महापालिकेत दाखल झाले असून ते मतमोजणीपर्यंत मुक्कामी राहणार आहेत.‘सूतगिरणी’त सर्वाधिक बुथ ४२२ प्रभागांतील ८६ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३५ मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक ४४ मतदान केंद्र सूतगिरणी प्रभागात तर सर्वात कमी २४ मतदान केंद्र त्रिसदस्यीय एसआरपीएफ वडाळी या प्रभागात आहेत. त्या पाठोपाठ ४० मतदान केंद्र राजापेठ श्री संत कंवरराम प्रभागात कार्यान्वित करण्यात आले आहेत. एकूण प्रभाग................२२एकूण जागा.................८७ एकूण मतदार.....५,७२,६४८पुरुष मतदार........२९५३१५स्त्री मतदार..........२७७३०५अन्य मतदार.................२८मतदान केंद्र...............७३५ संवेदनशिल केंद्र..........१७०उमेदवारांची संख्या.......६२८