शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आज मैं उपर, आसमाँ नीचे! १,६२२ जण बनले वैमानिक, २०२३ मध्ये नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:26 IST

विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी महिला वैमानिकांच्या संख्येतही वाढ झाली असून २९३ महिलांना व्यावसायिक वैमानिकाचा परवाना जारी झाला आहे.

मुंबई : सरत्या वर्षात तब्बल १,६२२ भारतीयांचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने वैमानिक होण्याचा विक्रम ठरला आहे. गेल्या वर्षी १,१६५ वैमानिक झाले होते. यंदा त्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी महिला वैमानिकांच्या संख्येतही वाढ झाली असून २९३ महिलांना व्यावसायिक वैमानिकाचा परवाना जारी झाला आहे.

नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एका वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना जारी करण्याचा हा विक्रम ठरला आहे. यंदाच्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी एकूण ११६ महिलांना वैमानिक म्हणून परवाना जारी झाला होता, त्यात लक्षणीय वाढ होत हा आकडा आता २९३ वर गेला आहे. 

तरुणांचा वाढता ओढानवीन हवाई मार्ग खुले होत असल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आगामी दशकभरात हजारो वैमानिकांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या वैमानिक म्हणून करिअर करण्याकडे तरुणांचा ओढा वाढत असल्याचे विश्लेषण हवाई तज्ज्ञांनी केले आहे. 

- २०१३-१४ या वर्षाच्या तुलनेत सरत्या दहा वर्षांत वैमानिक म्हणून आपले करिअर करणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१३-१४ मध्ये ७८२ लोक वैमानिक झाले होते. देशातील सर्वच विमान कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. - गेल्याच वर्षी इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन अव्वल विमान कंपन्यांनी तब्बल १,६०० नव्या विमानांची ऑर्डर दिली होती. तर, अन्य विमान कंपन्याही आपला ताफा वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. - येत्या दशकभरात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यातील नवीन विमानांची संख्या दोन हजारांचा टप्पा पार करेल. - तसेच देशात नवीन विमानतळांची बांधणी होत आहे, तर दुसरीकडे अनेक नव्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरदेखील भारतीय कंपन्या झेपावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.  हेलिकॉप्टर अकादमीलाही मान्यता  देशात हेलिकॉप्टरच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी सुरू करण्याच्या या उद्योगातील कंपन्यांच्या प्रस्तावालादेखील डीजीसीएने हिरवा कंदील दिला आहे. ही अकादमी चालू वर्षात सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमान