संजीव वेलणकर -
जन्म:- २० जुलै १९२१
पुणे, दि. 20 - सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे घराणेही अतिशय मोठे व नावाजलेले होते. पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला - डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. पं. सामताप्रसाद यांचे ३१ मे १९९४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे पं. सामताप्रसाद यांना आदरांजली.