शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मुख्यमंत्री घेणार आज म्हाडाची झाडाझडती!

By admin | Updated: May 7, 2015 05:44 IST

गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्यामुळे वादग्रस्त बनलेल्या म्हाडाच्या कारभाराची दखल घेण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना एकदाचा मुहूर्त मिळाला आहे.

अधिकाऱ्यांची भंबेरी : सहा महिन्यांनंतर मिळाला भेटीचा मुहूर्त, घरांची सोडत पारदर्शक होण्यासाठी करणार सूचनाजमीर काझी, मुंबई गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्यामुळे वादग्रस्त बनलेल्या म्हाडाच्या कारभाराची दखल घेण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना एकदाचा मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी ते प्राधिकरणाच्या प्रधान कार्यालयात येऊन कामकाजाचा आढावा, अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या घरांच्या सोडतीच्या पारदर्शकतेच्या अनुषंगाने त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची म्हाडामध्ये पहिलीच भेट असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. आज दिवसभर बैठकीत उपस्थित होणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती जमविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. फडणवीस सकाळी ११ वाजता म्हाडात येणार असून, सुमारे तासभर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दलाल व एजंटांच्या विळख्यात सापडलेला म्हाडातील कारभार गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त राहिला आहे. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांकडून लाच घेत असलेल्या विविध विभागांतील चौघा लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. युती सरकारकडून राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर केले जाणार आहे. इंग्रजीत व मराठीमध्ये ते बनविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून गतीने सुरू होते.गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती राज्यभर आहे. मात्र नागरिकांना घर मिळवून देणे, तसेच जुन्या इमारतीची पुर्नविकास योजना, ट्रान्झिस्टमध्ये नंबर लावण्याच्या आमिषाने दलालांनी लुबाडणूक केली आहे. म्हाडातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून ‘रॅकेट’ कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणांतून चव्हाट्यावर आले. -------दक्षता विभागाचा आढावा : गैरव्यवहाराला प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या दक्षता विभागातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे पद तब्बल १६ महिने रिक्त होते. त्यामुळे विभागाकडे आलेल्या तक्रारी, अर्ज चौकशीविना प्रलंबित राहिले होते. गेल्या महिन्यात या ठिकाणी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री दक्षता विभागातील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.