शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:13 IST

सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल असा विश्वास मामा चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केला.

मुंबई - आजच्या घडीला मराठी माणसांसाठी आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हीच चांगली घटना आहे. ही सकारात्मक पाऊले पडत आहेत. देवाच्या कृपेने आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या दृष्टीने हे चांगले आहे. मी मामा म्हणून दोघांनी एकत्र येण्याचे स्वप्न पाहत असतो आणि ते लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे असं विधान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी केले आहे. हिंदी सक्तीविरोधात मुंबईत निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चाला राज आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

या घटनेवर राज-उद्धव यांचे मामा चंद्रकांत वैद्य म्हणाले की, आज दोघे भाऊ एक पाऊल पुढे आलेत. भविष्यात एक एक हात पुढे येऊन ते एकत्र येतील असं मला वाटते. त्यांना सल्ला देण्यासाठी आता ते लहान नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे. पुढची पाऊले नक्कीच यशस्वी आणि सकारात्मक असतील अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे. वेळ आणि तारीख यासाठी शुभ संकेत मिळालेत. त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटते. राजकारणात काय चित्र बदलेल हे मला सांगता येत नाही. परंतु मराठी माणसांना आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यांना बळ मिळेल. मराठी माणसांची जी हेटाळणी होत आहे त्याला आळा बसेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल. मराठी माणसांना बळ मिळेल. मराठी माणसांचे यातून नक्कीच भले होईल. मराठी माणूस म्हणून मी नक्कीच या मोर्चात उतरेन. त्याशिवाय मामा म्हणून दोन्ही भाचे एकत्र पाहून मला खूप आनंद वाटेल. पुढे काय होणार हे जनता ठरवेल परंतु आजच्या घडीला जो मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्याविरोधात नक्कीच बळ मिळेल असा विश्वास ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलं. 

५ जुलैला निघणार मोर्चा

राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्याविरोधात मराठी भाषिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यात राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात उद्धव ठाकरेंनीही राज्य सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता मराठी मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित ५ जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :marathiमराठीhindiहिंदीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे