शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत २ लाख पतसंस्था सुरू करणार; केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 07:48 IST

या नव्या उपनियमांमुळे या पतसंस्थांचे लेखापरीक्षण वेळेवर होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक सॉफ्टवेअर तयार करून, या सर्व ६३ हजार संस्थांना जोडण्याचे काम सुरू आहे.

पुणे - केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलण्यास सुरू केले आहे. गावपातळीवरील प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या बळकटीकरणावर भर दिला जात आहे. येत्या तीन वर्षांत देशात नव्या दोन लाख अशा पतसंस्था सुरू करून ग्रामीण निम्न शहरी भागाची प्रगती साधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नवे सहकार धोरण तयार करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शाह यांनी दिली.

पुण्यात आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री अतुल सावे, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. अमित शाह म्हणाले, की देशात सध्या ६३ हजार प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यातून शेतकऱ्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. आता केंद्र सरकार या संस्थांसाठीचे उपनियम बदलत आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातूून प्रथम होणे अपेक्षित आहे.

पतसंस्थांमध्ये पारदर्शकताया नव्या उपनियमांमुळे या पतसंस्थांचे लेखापरीक्षण वेळेवर होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक सॉफ्टवेअर तयार करून, या सर्व ६३ हजार संस्थांना जोडण्याचे काम सुरू आहे. ज्या संस्थांनी तीन वर्षांत लेखापरीक्षण केले नाही, अशा संस्थांना ९० दिवसांची अवसायनाची मुदत दिली जाईल. त्यानंतर त्यांचे अस्तित्व आपोआपच रद्द होईल. त्याची जागा नवीन पतसंस्था घेईल. त्यामुळे पतसंस्था बुडविणाऱ्यांना नवीन संस्थेत स्थान उरणार नाही. या नियमांमुळे पादर्शकता वाढेल, असे मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

नवे सहकार धोरण लवकरचसध्याचे सहकार धोरण हे जुने झाले असून, या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी नव्या धोरणाची गरज आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नव्या सहकार धोरणाचा मसुदा तयार केला जात आहे. यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना मागविण्यात येतील. त्यातून नवे धोरण तयार करण्यात येईल, असे शाह यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह