शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वाघ जगवायचा, हत्ती पाेसायचा की माणूस वाचवायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 14:37 IST

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

राजेश शेगाेकार, वृत्तसंपादक, नागपूर -वाढत्या वनवैभवामुळे, टायगर कॅपिटल असे बिरूद मिरवण्याचा मान विदर्भाला मिळाला असला तरी मानव वन्यजिवांच्या संघर्षात शेकडाे निरपराध नागरिकांची अडकलेली ‘मान’ साेडवायची कशी, असा प्रश्न आता गंभीर झाला आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत वाघाने १० बळी घेतले आहेत. 

भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात ३,१६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक  ४४६ वाघ आहेत. विशेष म्हणजे, विदर्भात वाघांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात असून ६२५ चौ. कि. मी. वनक्षेत्रात पसरलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे.  वाघांचे हे वैभव जगभरात मिरवत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र  मानव व वन्यजीव संघर्ष माेठा आहे. त्यात आता हत्तींचीही भर पडली आहे. 

‘घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. आधीच घरात अनेक जनावरे आहेत, त्यांचीच व्यवस्था नीट हाेत नाही त्यात व्याह्यांकडून थेट घाेडेच सांभाळण्यासाठी पाठविल्यावर व्याह्यांना नाही म्हणता येत नाही अन् त्यांना सांभाळताना नवीनच संकट उभे राहते, अशी विचित्र स्थिती निर्माण हाेते. नेमका असाच अनुभव गडचिराेली, गाेंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत आहे. या भागात सरकार नावाच्या व्याह्याकडून घाेड्यांऐवजी थेट हत्तीच पाठविल्याने नव्या संकटाची भर पडली आहे.

काय केल्या आहेत उपाययोजनाचंद्रपूरच्या सीताराम पेठ येथे आभासी भिंतीचा प्रयोग तयार केला. या गावाभोवती सहा कॅमेरे वापरून संरक्षण भिंत तयार केली मानवासाठी धोकादायक ठरलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावणे, त्याचा मागोवा घेणे, लोकांत जनजागृती  वाघाचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो.एकाच वाघाकडून सतत हल्ले होत असतील तर घटनेचे स्वरूप पाहून जेरबंद केले जाते गस्त घालण्यासाठी गावातील युवकांची प्रायमरी रिस्पॉन्स टिम तयार केल्या. गावकऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजनांचा अंमल.

४६ हजार काेटींचा फटका- ग्रामीण भागाची वनांबरोबर असलेली सहजीवनाची भूमिका लोप पावली असतानाच वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अमलात आली. - आज भारतात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचे संवर्धन झाले. मात्र संघर्षही वाढला. मानव व वन्यजीव संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीच्या पाेटी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तब्बल ४६ हजार काेटींचा खर्च राज्य शासनाला करावा लागला आहे.  

झुंजीही वाढल्या अन् शिकारीहीमानव-वन्यजीव संघर्षासोबतच वाघांच्या झुंजींत वाढ झाली आहे. यामध्ये वाघांचे मृत्यूही होत आहेत. अलीकडेच ताडोबाच्या बफरमध्ये येत असलेल्या चंद्रपूर वन परिक्षेत्रातील झुंजीत दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वाघांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावण्यात येणारे विद्युतप्रवाह हेसुद्धा प्राण्यांच्या जिवावर उठले असून, १० वाघ विद्युतप्रवाहाचे बळी ठरले आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यात दुहेरी मरण- मुळातच जंगलव्याप्त गडचिराेली जिल्ह्यात १९८० ते ९० च्या दशकात वाघांचा वावर हाेता. शिकारींमुळे वाघांची संख्या घटली. २०१० पर्यंत वाघांच्या पाऊलखुणाही नव्हत्या.  - चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून वडसा वन विभागात वाघ स्थलांतरित झाले. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्यात आरमाेरी वन परिक्षेत्रापासून वाघांच्या हल्ल्यास सुरुवात झाली. - ऑक्टाेबर २०२१ मध्ये ओडिशातील २५ ते २६ रानटी हत्तींनी छत्तीसगडमधून गडचिराेलीत प्रवेश केला. दीड वर्षापूर्वी हत्ती छत्तीसगड राज्यात गेले हाेते. दाेन वर्षांत वाघाने ११, तर हत्तींनी ९ बळी घेतले आहेत. 

टॅग्स :Tigerवाघ