कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच प्रत्येकाने पुढे गेले पाहिजे. टिपू सुलतान यांनीदेखील शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम केले असावे ते ब्रिटिशांविरोधात लढत होते, आता ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे, असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्याबद्दल तुलनात्मक वक्तव्य केल्याने त्यांचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी खासदार शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. शाहू छत्रपती म्हणाले, आताच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा विचारांचा आदर्श घेऊन काम करणे गरजेचे आहे. शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम केले असावे. कारण ते ब्रिटिशांविरोधात लढत होते, आता ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे.
Web Summary : Shahu Chhatrapati believes Tipu Sultan drew inspiration from Shivaji Maharaj, fighting against the British. He urges investigation into who aided the British, emphasizing the need for leaders to emulate Shivaji's ideals.
Web Summary : शाहू छत्रपति का मानना है कि टीपू सुल्तान ने शिवाजी महाराज से प्रेरणा ली, अंग्रेजों के खिलाफ लड़ाई लड़ी। उन्होंने अंग्रेजों की मदद करने वालों की जांच करने का आग्रह किया, शिवाजी के आदर्शों का अनुकरण करने की आवश्यकता पर जोर दिया।