शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात ‘लोकमत’ने दिला आधार, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांपर्यंत मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:10 IST

कोरोनाच्या रूपाने जग अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या महामारीने प्रत्येकाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पार बदलून टाकले आहे.

 मुंबई : कोरोना संकटाने कित्येकांची जिवाभावाची माणसे कायमची हिरावून घेतली आहेत. ‘लोकमत’ परिवारातीलही काही सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या ‘लोकमत’ परिवारातील सदस्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंतचे विशेष अर्थसाहाय्य करण्याची घोषणा ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक व कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी केली आहे.  पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी ‘लोकमत’ने मानवतेचा हा कृतिशील आदर्श ठेवला आहे.कोरोनाच्या रूपाने जग अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. या महामारीने प्रत्येकाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पार बदलून टाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याचे बळ देण्याची गरज ओळखून ‘लोकमत’ने हे पाऊल उचलले आहे.कोरोनामुळे ‘लोकमत’ने आपल्या परिवारातील जिवाभावाची माणसे गमावली आहेत. त्यांच्या जाण्याने संस्थेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. अशा कसोटीच्या क्षणी शोक आवरता घेऊन कोलमडून पडलेले संसार सावरण्यासाठी आणि त्यांची आयुष्ये पुन्हा उभी करण्यासाठी त्यांना मायेचा, हक्काचा आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे.कोविडच्या या संकटकाळात ‘लोकमत’ परिवारातील प्रत्येक सदस्याची काळजी आणि त्यांच्याबद्दलची बांधिलकी जाणिवेतून ‘लोकमत केअर्स’ ही योजना आखण्यात आली असून, त्यामार्फत ही मदत केली जाणार आहे. या योजनेतून कोरोनामुळे जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना संरक्षित केले जाणार आहे. 

कोरोना महामारीमध्ये संपूर्ण देश संकटातून जात आहे. अनेक कुटुंबांची हानी होत आहे. मागील काही दिवसांत ‘लोकमत’ परिवारानेही आपले अनेक सदस्य गमावले आहेत. या अडचणीच्या काळात ‘लोकमत’ने कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्या सदस्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण काळात अडचणीत सापडलेल्यांसाठी हा प्रयत्न लाभदायक ठरेल, अशी मला आशा आहे.     - करण दर्डा, संपादकीय संचालक व कार्यकारी संचालक, लोकमत समूह

कुटुंब भावना‘लोकमत’ हा केवळ वृत्तपत्र समूह नसून हे एक कुटुंब आहे, याच भावनेतून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या कुटुंबीयांना भविष्याची ग्वाही देण्याचा हा कृतिशील प्रयत्न आहे. 

 

 

टॅग्स :Lokmatलोकमतcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र