शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाकींची वेळ यायचीय! फडणवीसांनी २९ जूनलाच संकेत दिलेले; 'चाणक्य'वर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 19:56 IST

समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही गोदावरी पात्रात आणणार आहोत. यासाठी सात वर्षे लागतील. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. - देवेंद्र फडणवीस

केसीआर एकमेकांच्या एबीसीडीचे चट्टेबट्टे आहेत. कोणी नवीन सुरुवात करतो त्याला आमच्यासोबत जोडले जाते. केसीआर आणि आमच्यात फरक हा आहे, त्यांच्या राज्यात बंडी संजय यांच्या नेतृत्वा आंदोलन करत होती. मी देखील अनेकदा गेलो. दोन वेळा माझ्या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. केसीआर इकडे आले तेव्हा आम्ही त्यांना आमच्याकडे लोकशाही आहे. नियमानुसार परवानगी घ्यावी, जेवढ्या सभा करायच्या आहेत करा. यामुळे भाजपाची मते कमी होणार नाहीत. आम्हाला त्याची चिंता नाही, असे केसीआर यांच्या व विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस यांनी उत्तर दिले.  

समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही गोदावरी पात्रात आणणार आहोत. यासाठी सात वर्षे लागतील. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. पावसात पाणी तुंबते. ते पाणी पंप करून बाहेर सोडावे लागणार आहे. ते काम गेली २० वर्षे होतच आहे. आम्ही ते अडीज वर्षात पूर्ण करू. रोजगार आणि तरुणांची लग्ने या गोष्टी आरोप करण्यासाठी बोलल्या जातात. चढ उतार येतात, जग महागाईने त्रस्त आहे. परंतू आमचा देश त्यावर नियंत्रण मिळवू शकला आहे. मी असे म्हणत नाहीय की स्वस्त झालेय. मोदींनी युरियावरील सबसिडी दिली आहे. युक्रेन युद्धामुळे युरियाचे दर तिप्पट वाढले आहेत, असे फडणवीस म्हणाले. 

गडकरींसोबत कसे संबंध? गडकरींसोबत तुमचे संबंध कसे आहेत, लोक म्हणतात की एकाच म्यानमध्ये दोन तलवारी असू शकत नाहीत. या प्रश्नावर त्यांची म्यान वेगळी आहे, माझी वेगळी आहे, असे फडणवीस म्हणाले. नागपुरचा विकास हे दोघांचे काम आहे. एका पक्षाचे, एकाच शहरातील नेते समन्वयाने काम करतात हे लोकांना विश्वासच बसत नाही. नागपूर पालिकेची तिकिटे वाटण्यासाठी मी आणि गडकरी बसलो होतो. तेव्हा काही तासांनी मी गडकरींना म्हटले की, मी निघतो मला मुंबई, पुण्याची तिकटेही वाटायची आहेत. गडकरींनी रात्री मला फोन केला दोन चार जागांवर मला ठीक वाटत नाहीय. तुझे मत काय असे ते म्हणाले होते, असा एक किस्सा फडणवीसांनी सांगितला. 

मी उपमुख्यमंत्री असलो म्हणून काही फरक पडत नाही. लोकसभेला राज्यातून ४२ पेक्षा कमी जागा जिंकणार नाही. मोदींना लोकांनी निवडले आहे, मला महाराष्ट्रात रहायचे आहे. मी ज्या विचारातून आलोय तिथे मोठे लोक निर्णय घेतात. त्यांनी कुठे सांगितले तिथे करेन, निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. मी खूप छोटा आहे, मी चाणक्य वगैरे नाहीय. परंतू, जर माझ्यासोबत कोणी चुकीचा वागला तर लक्षात ठेवून माझी वेळ यायची वाट पाहतो. काही गोष्टी मी सांगितल्या. अन्य गोष्टींची वेळ यायची आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. आम्हाला नकार दिल्यानंतर पवार मोदींना भेटायला गेलेले. तिथे त्यांनी पक्षातील काही लोक तयार नव्हते, आम्हाला तुमच्यासोबत यायचे होते, असे कारण दिलेले असे मला समजले होते, असा २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर आणखी एक खुलासा फडणवीसांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा