शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीमधील समाजघटकांवर स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 11:38 IST

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीसाठी ते अलिबाग येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले.

अलिबाग : ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजांनी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी राजकारण्यांनी ओबीसी समाजाचा वापर केला. संविधानाने दिलेला अधिकार हिरावून घेणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई सुरू झाली आहे. आता आपल्या न्याय्य हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीसाठी ते अलिबाग येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी केला आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्याच्या सत्ताधाऱ्यांबरोबर बोलणी सुरू आहेतच. आता केंद्रात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रसंगी संघर्ष करून व्यवस्थेला जेरीस आणू; परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असा  इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. अठरा पगड जातींचा समूह ओबीसीमध्ये मोडतो. त्यांचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ओबीसी समाजाने संघटित व्हायला हवे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.यावेळी व्यासपीठावर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष राजू साळुंके, महासचिव बालाजी शिंदे, धनंजय बेडदे, ॲड. शुभांगी शेरेकर, प्रा. संजीवकुमार जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना आपत्तीमध्ये दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साईनाथ पवार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण