शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

काळ आला, पण तो माउलीने परतावला

By admin | Updated: March 23, 2015 00:42 IST

मुरगूडमधील थरारक प्रसंग : जीव धोक्यात घालून आग आणली आटोक्यात

मुरगूड : ठिकाण मुरगूड (ता. कागल) येथील पाटील कॉलनीतील जीवनराव कटके यांचे घर. वेळ सायंकाळी पावणेआठची. अचानक घरामधून आरडाओरड, पळापळ सुरू झाली. कोणालाच काही कळेना. स्वयंपाक घरामध्ये सर्वत्र आगीचे लोळ, प्रचंड आवाज, धुराचे लोट, शेगडी आणि गॅस सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी. तिथेच दुसरे भरलेले सिलिंडर. काही वेळात नक्कीच दोन्ही सिलिंडरचा स्फोट होणार आणि घरातील सर्वांचे होत्याचे नव्हते होणार, असा थरकाप उडवणाऱ्या प्रसंगाने सर्वच बावरले असताना त्या घरातील माउली पुढे आली. तिने बेडरूममधून भली मोठी चादर घेऊन पेटणाऱ्या सिलिंडरवर टाकली. इतकेच नाही तर, हाताला चटके बसत असताना अगदी जोराने दाब देत बाहेर येणारा गॅस थोपविला. आणि बघता बघता आग आटोक्यात आली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता घराला वाचविण्यासाठी पुढे आलेली ही माउली म्हणजे लता कटके होय. तिच्या प्रसंगावधानाने आलेला काळ आणि आलेली वेळही परतून गेली.सेवानिवृत्त शिक्षक जीवनराव कटके यांनी येथील एस. टी. स्टॅँडच्या मागील बाजूला टोलेजंग बंगला काही वर्षांपूर्वीच बांधला आहे. याठिकाणी ते आपल्या दोन मुलांसह राहतात. काल सकाळी भरलेली दोन सिलिंडर घेतली होती. दरम्यान, सायंकाळी सुरू असलेले सिलिंडर संपल्याने भरलेले सिलिंडरचे सील काढले असता त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर जात होता. याबाबत मुरगूडमधील गॅस एजन्सीला कळविल्यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांनी लिक सिलिंडर बदलून दुसरे सिलिंडर दिले. सदरचे सिलिंडर जोडून शेगडी सुरू केली. त्यानंतर दहा मिनिटांत भयानक प्रसंग घडला.शेगडी, पाईपसह रेग्युलेटरने पेट घेतला. अगदी पंधरा ते वीस फुटांपर्यंत आगीने झेप घेतली. घरामध्ये यावेळी सर्वजण हजर होते. त्यात चार लहान मुले. आगीने तर रौद्ररूप धारण केले होते. काय करावे कोणालाच सूचत नव्हते. पाच ते सात मिनिटे आगीचे तांडव सुरू होते. सिलिंडर शेगडी तप्त झाली होती. घरातील सर्वांनीच घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. निदान सर्वांचा जीव तरी वाचेल, पण कोणच बाहेर पडण्यास धजावत नव्हते.इतक्यात लता कटके या पुढे सरसावल्या. त्यांनी बेडरुममधून एक मोठाली चादर आणली. त्याचा गोळा केला आणि तो गोळा सिलिंडरच्या वरील बाजूला धरला. सिलिंडरमधून बाहेर येणारा गॅस बंद झाला, पण आगीच्या ज्वाळा पाईपजवळ होत्याच. हाताला चटके बसत असतानाही या माउलीने जिवाच्या आकांताने रेग्युलेटर दाबून धरला होता. काही मिनिटांत आग विझली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)