शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल!

By admin | Updated: August 29, 2015 02:06 IST

वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट

- गणेश वासनिक, अमरावतीवाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत असे दल गठित करण्यात आले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्राचे नियंत्रण राहणार असून, त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना तस्करांनी लक्ष्य केल्यानंतर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांत संरक्षण दल गठित केले गेले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १२०, तर मेळघाटसाठी ८१ जवान या दलात दाखल करण्यात आले आहेत. आता पेंच, बोर व नवेगाव बांध अभयारण्यात व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया प्रस्तावित असल्याने ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.साहाय्यक वनसंरक्षक, पाच वनपालांच्या मार्गदर्शनात हे दल कार्यरत राहील. शिकार रोखणे, व्याघ्र प्रकल्पांत वाघांना धोका असलेल्या बाबी निदर्शनास येताच तसा अहवाल वरिष्ठांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी या व्याघ्र संरक्षण दलावर सोपविण्यात आली आहे. निमलष्करी दलाचा दर्जाटायगर प्रोटेक्शन फोर्सला निमलष्करी दलाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेष अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्व्हर, वाहन, राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याची फार पूर्वीची मागणी आहे. उशिरा का होईना, हे दल स्थापन झाल्याने विदर्भातील वाघांना संरक्षण मिळणार आहे. या दलाकडे वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मेळघाटचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांनी सांगितले.या दलाला तरी कालबाह्य प्रशिक्षण नकोव्याघ्र संरक्षण दल हे केवळ वाघांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आले आहे. मात्र वनविभागात जुन्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची परंपरा असल्याने हे प्रशिक्षण व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यास ते काहीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे या दलाला अत्याधुनिक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.