शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

वादळाने विजेचे ५८ खांब कोसळले

By admin | Updated: May 21, 2016 01:02 IST

सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला.

सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. तसेच परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे ५ किलोमीटर पर्यंत विद्युत तारा तुटल्या आहेत. कोसळलेले विद्युत खांब शोधण्याची मोहीम सुरूच आहे. आणखी २५ ते ३० कोसळलेले खांब सापडतील असे महावितरणने सांगितले आहे. गुरुवारी सायंकाळी सोमेश्वरनगर परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वाहणाऱ्या वाऱ्याचे अचानक चक्री वादळामध्ये रूपांतर झाल्याने अवघ्या एकाच तासात होत्याचे नव्हते झाले. घरांचे पत्र उडणे, भिंती कोसळणे, विद्युत खांब कासळणे, वृक्ष उन्मळून पडणे, टोमॅटो कोथिंबीर, कारली, दोडका, कडवळ यासारखी पिके अक्षरश: भुईसपाट झाली. त्याबरोबर उसाची पिकेही काही ठिकाणी भुईसपाट झाली. घरांची कौले उडणे, टेलिव्हिजनचे डिश उडून जाणे, पत्र्यांची शेड कोसळणे, नारळाची झाडे कोसळणे असे प्रकार घडले. अनेक रस्त्यांवर वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मळशी ते सोमेवर कारखाना दरम्यान नीरा डाव्या कालव्याचा रस्ता वृक्ष पडल्याने अजूनही बंदच आहे. शेतकऱ्यांबरोबर सर्वांत जादा नुकसान महावितरणचे झाले आहे. परिसरातील तब्बल ५८ विद्युत खांब कोसळले आहेत. वादळी वाऱ्यानंतर महावितरणने तातडीने २४ कर्मचारी असलेल्या ३ गँगमनच्या तुकड्यांना पाचारण केले आहे. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व गँगमन मिळून खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी (दि. २०) सकाळपासून वाणेवाडी, वाघळवाडी, मुरूम या ठिकाणावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. सर्वांत जादा नुकसान झालेल्या मळशी गावामध्ये शनिवारी (दि. २१) संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ शकतो असे सोमेश्वरनगर येथील महावितरणचे उपअभियंता अभिजित बिरनाळे यांनी सांगितले. या चक्रीवादळामध्ये महावितरणचे जवळपास ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. (वार्ताहर)>शहारे आणणारे वादळगेल्या दोन वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर परिसराला अशाच प्रकारच्या चक्रीवादळाने तडखा दिला होता. त्या वेळी दीड ते दोन हजार वृक्ष पडले होते. तर १५०च्या वर विद्युत खांब कोसळल्याने तब्बल १५ दिवस सोमेश्वरनगर परिसर अंधारात होता. त्याच चक्रीवादळाची आठवण सोमेश्वरवासीयांना झाली होती.