शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

सिंधुदुर्ग वनविभागाचा उपक्रम : ‘मिशन एलिफंट’ इंग्रजीतून प्रसिद्ध

अनंत जाधव - सावंतवाडी -- महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग वनविभागाने यशस्वीपणे राबवलेली हत्ती पकड मोहीम आता पुस्तकरुपाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. यासाठी वनविभागाने ‘मिशन एलिफंट’ या नावाने इंग्रजीतून पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रती देशाचे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आल्या आहेत. मोहिमेत विशेष लक्ष घालणारे खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक केंद्रीयमंत्री व खासदारांना सुपूर्द केले आहे.जिल्ह्यात मार्च २०१३ मध्ये दाखल झालेल्या उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेल्या चार हत्तींचा अभ्यास केला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून हत्ती पकड मोहिमेला परवानगी मिळविली. परवानगी मिळाल्यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांचीही मदत घेतली. ८ ते १६ फेबु्रवारी २०१५ या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मोहीम यशस्वी झाली. सिंधुदुर्गवासीयांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात या यशस्वी मोहीमेची गाथा जावी, यासाठी वनविभागाने या मोहिमेची खास पुस्तकरुपी माहिती तयार केली आहे. या पुस्तकात हत्ती पकड मोहिमेबरोबरच हत्तींनी गेल्या काही वर्षात केलेले नुकसान तसेच हत्तीहल्ल्यात मृत पावलेले व जखमी ग्रामस्थ या माहितीसह मोहिमेसाठी कोणी कसे प्रयत्न केले, कर्नाटकमधून कोणत्या जंगलातून हत्ती आले, तसेच त्यांना लागणारी साधन सामुग्री, येथील हवामान याबाबतची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कल्पनेतून तयार झाले असून, त्यांना सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांचीही साथ लाभली आहे.सध्या या पुस्तकाच्या प्रती इंग्रजीमधून प्रसिद्ध करण्यात आल्या असून, वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुस्तके देण्यात आली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक संसदेत केंद्रीय मंत्री व खासदारांना प्रदान केले.मोहीम स्मरणात राहण्यासाठी पुस्तक : एस. रमेशकुमारमोहीम आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि ती यशस्वीही झाली. पुस्तकरुपाने ही मोहीम लोकांच्या कायम स्मरणात रहावी, यासाठी पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे मत उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.