शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 09:09 IST

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रौत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान बुधवारी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली.

अप्पासाहेब पाटील / अमित सोमवंशीतुळजापूर, दि. 21 - तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. बुधवारी मध्यरात्रीपासून धार्मिक विधिला प्रारंभ झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.बुधवार व गुरुवारच्या मध्यरात्रीपासून नऊ दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली. रात्री १ वाजता श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा उस्तव पार पडला. यानंतर मुर्तीची विधीवत् सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेवेळी विशेष पंचामृत अभिषेक करून नित्योपचार पंचामृत अभिषेक देवीस नैवेद्य, धुप-आरती व अंगारा झाल्यानंतर विशेषालंकार पूजेनंतर आरती करण्यात आली. यानंतर यजमान दांम्पत्याच्या हस्ते गोमुखावरुन सवाद्य घटकलश आणून त्याचे पूजन करीत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. घटस्थापनेनंतर यजमानांच्या हस्ते ब्राम्हणवृंदास वर्णी देवून मंदिरात विविध धार्मिक ग्रंथाचे पठण केले जाणार आहे़दरम्यान, या उत्सवात देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक बुधवारी तुळजापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी गर्दीने फुलून गेली होती. शिवाय गावागावात सार्वजनिक मंडळाच्या वतीने साज-या होणा-या उत्सवासाठी तुळजापूर येथून भवानी ज्योत पेटवून नेली जाते. यासाठी बुधवारी रात्रीपासून नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी तुळजापुरात दाखल होत होते. बुधवारी दिवसभरात हजारो कार्यकर्त्यांनी तुळजापुरातून भवानी ज्योत पेटवून नेली. बुधवारी रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.

 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७