शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

सांगलीत अपघातात तीन तरुण ठार

By admin | Updated: July 7, 2017 13:50 IST

भरधाव मोटार रस्त्याच्याकडेला झाडावर आदळल्याने तीन तरुण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सांगली, दि. 7 - भरधाव मोटार रस्त्याच्याकडेला झाडावर आदळल्याने तीन तरुण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. सांगलीतील पुष्पराज चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता हा अपघात झाला. मोटारीचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. 
विकी अंकुश चव्हाण (वय २४, रा. यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (२६, जैन गल्ली, सोन्याची शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व निनाद राजेंद्र आरवाडे (२२, एसटी कॉलनी, विश्रामबाग, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीचा चालक नितांत राजेंद्र बुटाले (२६, पत्रकारनगर, सांगली) व सुनील महावीर मडके (२२, कवठेपिरान, ता. मिरज) हे दोघे जखमी आहेत. बुटाले हा गंभीर असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मडके किरकोळ जखमी झाला होता. त्याला उपचार करुन घरी सोडले आहेत. 
मृत व जखमी मित्र आहेत. यातील बुटाले हा बांधकाम व्यवसायिक आहे. मडके त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. सध्या त्यांचे दुधगाव (ता. मिरज) येथे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी खडी लागणार असल्याने दोघेही गुरुवारी रात्री खडी आणण्यासाठी टोप-संभापूर (जि. कोल्हापूर) येथे गेले होते. खडी घेऊन ते रात्री उशिरा सांगलीत परतले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला. मृत विकी, सम्मेद व निनाद आरवाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना  सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथील हॉटेल ‘खवय्या’मध्ये जेवायला जाऊ, असे सांगितले. बुटाले व मडके यांनी मोटारीने (क्र. एमएच ०२, एवाय ४९१) या तिघांना जेवायला नेले. जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजता ते हॉटेलमधून बाहेर पडले. बुटाले मोटार चालवित होता, तर त्याच्याबाजूला मडके बसला होते. मृत तिघेही पाठीमागील सीटवर बसले होते. ते भरधाव वेगाने सांगलीत येत होते. 
मार्केट यार्डजवळील गतीरोधकावर प्रथम मोटार जोरात आदळली. तेथूनच बुटालेचा ताबा सुटला होता. तरीही तो त्याच वेगाने पुढे आला. जिल्हा बँकेसमोर त्याचा पुन्हा ताबा सुटल्याने मोटार थेट रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. मोटार एवढ्या जोरात आदळली की, पाठीमागे बसलेल्या तिघांना बाहेरही पडता आले नाही, एका वाहनधारकाने हा अपघात पाहिला.