शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

MPSC उत्तीर्ण होऊन तीन वर्षे झाली, ‘ते’ अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 06:13 IST

शेकडाे तरुण-तरुणींना आले नैराश्य, एक ना अनेक कारणांमुळे नियुक्त्या रखडल्या; वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

मुंबई - एमपीएससीची  पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखत होऊन त्यात पात्र ठरल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने शेकडो तरुण - तरुणी नैराश्याचा सामना करीत आहेत. सुमारे २१५ अभियंते तीन वर्षांपासून नियुक्तीची प्रतीक्षा करीत आहेत. आधी कोरोना, मग मराठा आरक्षण, पुढे इडब्ल्यूएसची गोची आणि आता न्यायालयीन प्रक्रिया, असे एक एक रडगाणे सांगत राज्य शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पात्र अभियंते वाट पाहून थकले आहेत.

एमपीएससीने १८ मार्च २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा या विभागांतील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब साठी जाहिरात काढली. यात हजारो उमेदवारांनी मार्च २०२१मध्ये पूर्व परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झालेल्यांनी डिसेंबर २०२१ रोजी मुख्य परीक्षा दिली. दरम्यान, मे २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. राज्य सरकारने त्यांना आर्थिक दुर्बल गटात (इडब्ल्यूएस) समाविष्ट करून प्रक्रिया पुढे सुरू केली. मात्र, यामुळे इडब्ल्यूएस गटातील मूळ उमेदवार बाहेर फेकले गेल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि पुन्हा रखडगाडी सुरू झाली.

अभियंत्यांच्या नियुक्तीस दिरंगाई का? एमपीएससीमार्फत झालेल्या २०२०च्या राज्य सेवा परीक्षा, एएमव्हीआय, आरटीओ पदांची भरतीप्रक्रिया आटोपून नियुक्त्याही मिळाल्या. आरक्षणाचा घोळ असतानाही त्या विभागांनी विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन न्यायालयाच्या अधीन राहूनही तत्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली. जर नियम व कायदे सर्व नियुक्तीचे सारखे आहेत तर अभियंत्यांची नियुक्ती देण्यात संबंधित विभागांची दिरंगाई का? असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा