शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

नोकरीचे अमिष दाखवून अहमदनगरच्या महिलेवर तिघांनी केला बलात्कार

By admin | Updated: October 21, 2016 17:17 IST

नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहित महिलेस नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापूर, गाणगापूर, सोलापूरात नेऊन ठिकठिकाणी तिघांजणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २१ : नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहित महिलेस नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापूर, गाणगापूर, सोलापूरात नेऊन ठिकठिकाणी तिघांजणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात उघडकीस आली़ पिडीत महिला ही शेळगाव. (ता. श्रीगोंदा.जि. अहमदनगर) येथील आहे. या महिलेचे वय ३५ आहे़ याप्रकरणी पिडीत महिलेने लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

पैगबर उर्फ सय्यद दगडू शेख (वय ४०), चंद्रकात महादेव स्वामी (वय ३१. सुलतानपूर.ता.अक्कलकोट), आप्पासाहेब दत्तू तोडकर (रा.नान्नज.ता.उत्तर सोलापूर) अशी बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या तिघांना शुक्रवारी सोलापूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले आहे़

दरम्यान, ११ आॅक्टोबर २०१६ रोजी पिडीत महिलेचे स्वत:च्या पतीबरोबर भांडण झाले होते़ त्यामुळे पिडीत महिलेने रागाच्या भरात घर सोडले होते़ कुठे जावे़ क़ाय करावे या प्रश्नांची उत्तरे शोधत ती महिला पुण्याला जाण्यासाठी अखेर दौंड रेल्वे स्टेशन गाठले़ मात्र तेथुन कुठे जावे या व्दिदा मनस्थितीत असलेल्या महिलेने सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेत बसून प्रवास केला़ इथे काही तरी काम मिळेल या आशाने त्या महिलेने सोलापूर रेल्वे स्थानकावरच उतरणे पसंत केले़ यावेळी आरोपी चंद्रकांत स्वामी याने नोकरीचे आमिष दाखवून तिला पुण्याला जावू असे सांगितले़ नोकरीच्या निमित्ताने आरोपी स्वामी याने त्या पिडीत महिलेस पुणे, कोल्हापूर, गाणगापूर असे शहरे फिरविली मात्र काम काय मिळवून दिले नाही़ उलट त्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला़ यानंतर आरोपी स्वामी याने तिला सोलापूरात आणून आरोपी पैगबंर शेख यांची ओळख करुन देवून त्याच्याकडे काम देण्याचे आमिष दाखवुन तिला त्याच्या सोबत जाण्यास भाग पाडले.

मात्र सय्यद यानेही तिला काम देतो असे आमिष दाखवूृन सोलापूर रेल्वे स्टेशन व त्याचा मित्र आरोपी आप्पासाहेब यांच्या दुचाकीवर बसवून पाकणी येथे आणून तिच्या अत्याचार केला. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरूच होते़